विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Puja Khedkar वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा पूजा खेडकरवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करून मोठा दणका दिला. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची कोर्टात केसही सुरू आहे. पूजा खेडकरने शुक्रवारी एम्समध्ये तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. पूजाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल होता. पण केंद्र सरकारने सर्व प्रकरणाची दखल घेऊन तिची सेवाच समाप्त करून टाकली. Puja Khedkar
पूजा खेडकर हिचे नाव, तिच्या पालकांचे नाव, सही, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून आपली ओळख खोटी करून परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पूजा खेडकर तिच्या अधिकारांचा गैरवापर करून CSE (नागरी सेवा परीक्षा) 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पूजा खेडकरची सेवा समाप्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पूजा खेडकर यांनी दोन ओळखपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते दिले. त्यांना आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिला, तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता.
पूजा खेडकर 2020-21 मध्ये OBC कोट्यातील परीक्षेत ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने बसली होती. 2021-22 मध्ये सर्व प्रयत्न पूर्ण केल्यानंतर, पूजा OBC आणि PWBD (अपंग व्यक्ती) कोट्याअंतर्गत परीक्षेला बसली. तेव्हा ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ हे नाव वापरले होते. यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी खटला सुरू केला. यानंतर पूजा खेडकरने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टासमोर दिलेल्या उत्तरात पूजाने दावा केला की तिने युपीएससीला तिच्या नावाने फेरफार करण्याचा अधिकार नाही.
दरम्यानच्या काळात पूजा खेडकरची आई आणि तिचे वडील यांची ही वेगवेगळी गैरव्यवहार प्रकरणे बाहेर आली. त्याची माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली होती.
Puja Manorama Dilip Khedkar, IAS Probationer discharge
महत्वाच्या बातम्या
- Solution Provider : पंतप्रधान मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात ‘सोल्युशन प्रोव्हायडर’च्या भूमिकेत
- Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील ‘AIIMS’मध्ये व्हेंटिलेटरवर हलवले
- Mohan Bhagwat : समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचल – मणिपूरमधल्या स्थितीत सुधारणा; सरसंघचालकांचा विश्वास!
- Vladimir Putin : ‘भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ होऊ शकतात…’, युक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चेवर पुतिन यांची मोठी घोषणा