• Download App
    Puducherry The Focus India Exit Poll Results 2021:केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत भाजपची बाजी ; कमळ फुलणार ; काँग्रेसचे स्वप्न भंगणार ! Puducherry The Focus India Exit Poll Results 2021 

    Puducherry The Focus India Exit Poll Results 2021:केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत भाजपची बाजी ; कमळ फुलणार ; काँग्रेसचे स्वप्न भंगणार

    पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित एनडीए सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुद्दुचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशातील महासंग्रामात नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.तमिळनाडूच्या किनार्यावर वसलेले नितांतसुंदर केंद्रशासित प्रदेश भाजपचे स्वागत करेल, असा एक्झिट पोल्सचा अंदाज आहे.काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. Puducherry The Focus India Exit Poll Results 2021

    तीसपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 18 ते 22 जागा मिळवू शकते.काँग्रेसप्रणित युपीएला 8 ते 11 जागा मिळतील अशी शक्यता आहे.

    एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा

    भाजपप्रणित NDA – 18 ते 22 जागा
    काँग्रेसप्रणित UPA –   8 ते 11  जागा
    एकूण – 30 जागा

    पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात पार पडली निवडणूक

    राष्ट्रपती राजवट असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 6 एप्रिल 2021 रोजी निवडणूक पार पडली. एकाच टप्प्यात चार जिल्ह्यांतील 30 जागांसाठी मतदान पार पडले असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पुद्दुचेरीच्या विधानसभेवर केंद्र सरकारकडून तीन सदस्यांची शिफारस केली जाते.

    राष्ट्रपती राजवट

    पुद्दुचेरीमध्ये निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी तिथले सरकार गडगडले होते. त्यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट लागली होती. गेल्या 22 फेब्रुवारीला काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे संकटात आलेले पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले. आमदारांनी साथ सोडल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

    2016 ची तुलना-

    2016 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या.

    एआयएनआरसी चीफ एन रंगास्वामी संयुक्त संघाचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात.

    Puducherry The Focus India Exit Poll Results 2021 

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!