विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज गुरुवारी आपला २ लाख ४३ हजार ९६५ कोटी रुपयांचा शेवटचा २०२२-२३ या वषार्साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये गायींचे संरक्षण व भटक्या जनावरांसाठी तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.Provision of Rs.500 crore for protection of cows in Gujarat budget
अर्थमंत्री कनू देसाई यांनी गेल्या वषीर्चे २ लाख २७ हजार २९ कोटींच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्ती तरतूदीचा अर्थसंकल्प मांडला. गायींचे महत्त्व आणि त्यांचा संबंध भगवान कृष्णाशी जोडून अर्थमंत्र्यांनी ५०० कोटींची तरतूद मुख्यमंत्री गौ माता पोषण योजनेसाठी जाहीर केले. यात गौशाळा आणि पांजरपोळसचे व्यवस्थापन केले जाईल.
१०० कोटी रुपयांचे अधिकचे अर्थसंकल्पीय तूरतूद करण्यात आली आहे. यातून शहर आणि ग्रामीण भागातील भटक्या जनावरांचा प्रश्न सोडवला जाईल. सरकारने २१३ कोटी रुपयांचे सेंद्रिय शेतीसाठी दिले आहे.
गेल्या वर्षी २२ लाख नोकऱ्या पाच वर्षांमध्ये निर्माण करण्याचे वचन देण्यात आले होते. देसाई म्हणाले, की २००१ मध्ये राज्याचा जीडीपी १.२५ लाख कोटीने वाढले होते. कोविडचा प्रतिकुल परिणाम असताना राज्याला जीडीपी दोन अंकी गाठण्याची अपेक्षा आहे.
Provision of Rs.500 crore for protection of cows in Gujarat budget
महत्त्वाच्या बातम्या
- उद्या “झुंड” प्रदर्शित; आज महानायक सिद्धिविनायक चरणी…!!
- Maharashtra assembly session : गेल्या वेळच्या अधिवेशनात मांजरीचे “म्याव गाजले… यावेळी “साप” डोलतोय…!!
- Putin – Modi talks : 6 तासांसाठी हवाई हल्ले थांबवले!!; खारकीव्हमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले… हे कसे घडले…??
- यशवंत जाधव : 2 कोटी, 1.5 कोटी, 130 कोटी, 200 कोटी… हे आकडे काय बोलतायत…??