Friday, 9 May 2025
  • Download App
    पैैशासाठी दिल्लीतील पत्रकाराकडून चीनसाठी हेरगिरी, गोपनिय आणि संवेदनशील माहिती पुरविली|Provided espionage, confidential and sensitive information to China from a Delhi-based journalist for money

    पैैशासाठी दिल्लीतील पत्रकाराकडून चीनसाठी हेरगिरी, गोपनिय आणि संवेदनशील माहिती पुरविली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पैशासाठी एका पत्रकारच चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिनी गुप्तचर अधिकाऱ्यांना गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या पत्रकाराची दिल्लीतील मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्याचे मूल्य ४८.२१ लाख रुपये इतके आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे.Provided espionage, confidential and sensitive information to China from a Delhi-based journalist for money

    ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत मुक्त पत्रकार राजीव शर्मा याच्यावर ही कारवाई केली आहे. दिल्लीतील पीतमपुरा भागात असलेली शर्मा याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले गेले असून त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी राजीव शर्मा याच्यावर २०२० मध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.



    त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून १४ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्याला जामीन मंजूर केला आहे.चीनला भारतीय सैन्याच्या तैनातीबाबत तसेच सीमेवरील रणनीतीबाबत अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुरवल्याचा राजीव शर्मा याच्यावर आरोप आहे.

    ईडीच्या तपासातून राजीव शर्मा याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचे उघड झाले आहे. महिपालपूर भागातील एका बनावट कंपनीचा यात सहभाग होता. चिनी नागरिक झांग चेंग उर्फ सूरज, झांग लिक्सिया उर्फ उषा, किंग शी तसेच नेपाळी नागरिक शेर सिंह उर्फ राज बोहरा यांच्याकडून ही कंपनी चालवली जात होती.

    हे सर्वजण चिनी गुप्तचरांसाठी काम करत होते. या कंपनीच्या माध्यमातूनच राजीव शर्मा याला गोपनीय माहितीच्या बदल्यात पैसा पुरवण्यात आला. शर्मा याने शिताफीने ही सारी रक्कम आपल्या मित्राच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितल्याचेही समोर आले आहे. शर्मा याला या कंपनीने विदेश सैरही घडवली आहे.

    Provided espionage, confidential and sensitive information to China from a Delhi-based journalist for money

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!

    भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती; म्हणून पाकिस्तानच्या बचावासाठी करताहेत “बौद्धिक कसरती”!!

    Pralhad Joshi : देशात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही, अफवांवर लक्ष देऊ नका – प्रल्हाद जोशी