कोण काय म्हणतो याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही, असंही मिथुन चक्रवर्तींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : Mithun Chakraborty उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठ्या संख्येने लोक येत आहेत. दुसरीकडे, महाकुंभमेळ्याबाबत राजकीय विधानही सुरूच आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवस आधीच महाकुंभाचे वर्णन मृत्युकुंभ असे केले होते. यानंतर, मंगळवारीही महाकुंभमेळ्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले. त्यावर आता अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनीही ममता बॅनर्जी यांच्या विधानावर आपले मत मांडले आहे.Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “ते म्हणतील की हे सर्व चुकीचे आहे, पण डोळ्यांना जे दिसत आहे ते चुकीचे आहे का? ७० कोटी लोक पवित्र स्नान करत आहेत ते चुकीचे आहे का? फक्त लक्षात ठेवा की लोकांनी सनातन धर्माची शक्ती पाहिली आहे. म्हणून अभिमानाने सांगा की आम्ही सनातनी आहोत.’’
तसेच ‘’मी म्हणतोय की तुम्ही स्वत:च बघा की हे काय आहे, हा महाकुंभ आहे. हे पवित्र स्नान आहे, ७० कोटी लोक असेच येत नाहीत. कोण काय म्हणतो याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. मी जे पाहत आहे ते म्हणत आहे, की सनातन धर्माची शक्ती बघा. म्हणून अभिमानाने सांगा की आम्ही सनातनी आहोत.” असंही मिथुन चक्रवर्तींनी म्हटलं आहे.
Proudly say that we are Sanatani Mithun Chakrabortys statement about Mahakumbh
महत्वाच्या बातम्या
- सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट, महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
- Ukraine war : युक्रेन युद्धावर अमेरिकेची माघार; संयुक्त राष्ट्रांत रशियन हल्ल्याच्या निषेधास नकार, इस्रायलचाही पाठिंबा
- कर्नाटकला जाणाऱ्या बसेसमध्ये आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मार्शल, पोलीस असणार?
- मोदी सरकार आहे का “फॅसिस्ट”??; भांडायला लागलेत वेगवेगळे कम्युनिस्ट!!