• Download App
    विमानतळांना आत ड्रोनरोधक प्रणालीचे संरक्षण, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा निर्णय|Protection of anti-drone systems for airports, decision of Airports Authority of India

    विमानतळांना आत ड्रोनरोधक प्रणालीचे संरक्षण, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विमानतळांवर ड्रोनचे हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) १० कोटी रुपये खर्चून ड्रोनरोधक दोन प्रणाली विकत घेणार आहे.एएआयच्या सूत्रांनी सांगितले की, ड्रोनचा माग काढणे, त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, त्यांना नष्ट करणे Protection of anti-drone systems for airports, decision of Airports Authority of India

    या कामांसाठी एएआय त्यासंदभार्तील मल्टिसेन्सर तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रणाली ९.९ कोटी रुपयांना विकत घेणार आहे. जून महिन्यात जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर ड्रोननी बॉम्बहल्ला केला होता. त्यात दोन लष्करी जवान जखमी झाले होते.



    जम्मू येथे जून महिन्यात हवाई दलाच्या तळावर ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यानंतर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला.त्या घटनेनंतर एएआयने ड्रोनरोधक प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जूनमध्ये जम्मू विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक स्मित शहा यांनी सांगितले की, ड्रोनद्वारे होणारे हल्ले रोखण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता त्या क्षेत्रात भारताने मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

    ड्रोनरोधक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतातील काही कंपन्या स्वदेशात संशोधन करत आहेत. काही कंपन्यांनी अशा संशोधनासाठी विदेशी कंपन्यांचे सहकार्य घेतले आहे. ड्रोनचा माग काढण्यासाठी, त्यांना नष्ट करण्याकरिता रेडिओ लहरी उपकरणे, इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली, एकोस्टिक तंत्रज्ञान, किंवा कंबाईन्ड सेन्सर्स टेक्नॉलॉजी या गोष्टींचा वापर केला जातो.

    ड्रोनमुळे देशाच्या सुरक्षेला असलेला धोका कसा रोखता येईल याविषयीचे धोरण केंद्रीय नागरी वाहतूक खात्याने ऑक्टोबर २०१९मध्ये तयार केले. अणुऊर्जा प्रकल्प, लष्करी तळ यांचा ड्रोन हल्ल्यांपासून कसा बचाव करता येईल याचा या धोरणात विचार करण्यात आला आहे. जगभरात महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

    Protection of anti-drone systems for airports, decision of Airports Authority of India

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले