• Download App
    पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती : गोव्यात डाॅ. प्रमोद सावंत सरकार देणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत!! । Promise fulfilled in the first blow: In Goa, Dr. Pramod Sawant government will give 3 gas cylinders for free every year !!

    पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती : गोव्यात डाॅ. प्रमोद सावंत सरकार देणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत!!

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती केली आहे. गोव्यात काल शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत गोव्यातील जनतेला वर्ष एका वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. Promise fulfilled in the first blow: In Goa, Dr. Pramod Sawant government will give 3 gas cylinders for free every year !!

    सावंत यांनी शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राज्यपालांच्या अभिभाषणात देखील मंजुरी देण्यात आली. त्यानुसार गोव्यात आता वर्षाला 3 एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. याशिवाय मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या अभिभाषण मसुद्यालाही मंजुरी दिली आहे.



    – एप्रिल पासून ही योजना लागू

    मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर ही योजना अधिसूचित केली जाईल. यासाठी उत्पन्नाची मर्यादा आणि अन्य तपशील ठरवण्यात येत आहेत. एप्रिलपासून ही योजना लागू केली जाणार आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या संकल्पपत्रातील सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाणार आहेत. आमच्यासाठी ती केवळ आश्वासने नसून ते जनतेला दिलेली वचने आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    – संकल्प पत्रातील अन्य आश्वासने

    सत्तेवर आल्यास वर्षाला 3 एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन जाहिरनाम्यात दिले होते. वर्षासाठी महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत, ज्येष्ठ नागरिकांना दयानंद सुरक्षा योजनेखाली मिळणारे मानधन वाढवून 3 हजार रुपये, 6 महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरु करणार, अशी प्रमुख आश्वासने संकल्प पत्रात दिली आहेत या संकल्प पत्राचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

    Promise fulfilled in the first blow: In Goa, Dr. Pramod Sawant government will give 3 gas cylinders for free every year !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार