वृत्तसंस्था
अमृतसर : खलिस्तानवाद्यांना मोडून काढणाऱ्या ऑपरेशन ब्लूस्टारला आज 38 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईच्या विरोधात आज पंजाबमधील खलिस्तानवाद्यांनी अमृतसरमध्ये बंद पुकारला आहे. आज सकाळी सुवर्ण मंदिराजवळ काहीजणांनी एकत्र येत खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी या जमावाने खलिस्तानी नेता जरनैल भिंद्रनवालेचे पोस्टरदेखील झळकावले. या घटनेनंतर अमृतसरमध्ये तणावाची स्थिती आहे. Proclamation in support of Khalistan outside the Golden Temple
पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ झाली आहे. हत्यासत्र सुरू झाले आहे. सरकारने सुरक्षेचा आढावा घेण्याच्या निमित्ताने जे फेरबदल केले त्यामधून ढिलाई तयार झाल्याने हे घडत असल्याचा आरोप अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंजाब मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची भलीमोठी यादीच बादल यांनी सादर केली आहे.
अमृतसरमध्ये आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवला आहेच. त्याशिवाय, सुवर्ण मंदिरातही मोठ्या प्रमाणावर पोलिसांना बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस असतानाही खलिस्तानवाद्यांनी तलवारींसह सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी या शेकडोंच्या जमावाने सुवर्ण मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना सुरक्षा रक्षकांनी अटकाव केला.
अमृतसरमध्ये कडेकोट बंदोबस्त
ऑपरेशन ब्लू स्टारला 38 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये निमलष्करी दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे.
कट्टरतावादी शीख संघटनांनी रविवारी आझादी मार्च काढला. यामध्ये दल खालसा, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) आदी संघटनांसह इतर खलिस्तानवादी गट सामील झाले होते.
Proclamation in support of Khalistan outside the Golden Temple
महत्वाच्या बातम्या
- आपका मुसेवाला होगा; सलमान खानला वडिलांसह जीवे मारण्याची धमकी!!
- उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावे; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार म्हणणाऱ्यांना शिवसेनेचा टोला!!
- ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलासह 21 मंत्र्यांनी घेतली शपथ, काल सर्वांनीच एकत्र दिला होता राजीनामा
- खुद्द पंकजा मुंडे यांना नसेल एवढी मराठी माध्यमांनाच त्यांच्या राजकीय भवितव्याची “काळजी”!!