• Download App
    भारत - चीन तणावादरम्यान नेपाळमध्ये सत्तांतर; चीन समर्थक नेते पुष्पकमल दहल प्रचंड पंतप्रधानपदी Pro-China leader Pushpa Kamal Dahal as prime minister

    भारत – चीन तणावादरम्यान नेपाळमध्ये सत्तांतर; चीन समर्थक नेते पुष्पकमल दहल प्रचंड पंतप्रधानपदी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील तणावा दरम्यान एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोडी घडली आहे. भारत आणि चीन यांच्यातील देश नेपाळमध्ये सत्तांतर घडले आहे. चीनकडे राजकीय झुकाव असलेले माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्पकमल दहल प्रचंड पंतप्रधानपदी आले आहेत. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी प्रचंड यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे उद्या सोमवारी दुपारी 4.00 वाजता ते पंतप्रधान पदाची शपथ घेतील. Pro-China leader Pushpa Kamal Dahal as prime minister

    पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या माओवादी कम्युनिस्ट पार्टीने नेपाळी काँग्रेसच्या पाठिंबा काढून घेऊन चीनचे दुसरे समर्थक नेते के. पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी बरोबर आघाडी करून हे सत्तांतर घडविले आहे. आता पहिल्या 2.5 वर्षात पुष्प कमल दहल प्रचंड पंतप्रधान असतील, तर दुसऱ्या अडीच वर्षात के पी शर्मा ओली हे पंतप्रधान असतील. या दोन्ही नेत्यांच्या पक्षांमध्ये हा करार झाला आहे.

    भारत आणि चीन यांच्यात नव्याने तणाव निर्माण होऊन त्याचे प्रतिबिंब लडाख आणि तवांगमध्ये उमटले असताना नेपाळ सारख्या शेजारी राष्ट्रात सत्तांतर घडणे आणि त्यात चीन समर्थक नेत्यांमध्ये तडजोड होऊन 5 वर्षांसाठी सत्ता वाटप होणे याला भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.


    नेपाळच्या सीमेवर नाशिकच्या जवानाला वीरमरण , उच्चदाब प्रवाहाचा विजेच्या तारेचा धक्क्याने 3 सैनिकांची प्राणज्योत मालवली


    जागतिक राजकीय पटावर चीन विरोधी शक्तींचा सर्वात महत्त्वाचा राजकीय घटक म्हणून भारत मोठ्या शक्तीनिशी उदयाला आला आहे. पॅसिफिक आणि हिंदी महासागरात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान अशा बलाढ्य राजकीय चतुष्कोण अर्थात “क्वाड” मध्ये भारताची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर चीन देखील आंतरराष्ट्रीय राजकीय पटावर काही मुस्लिम देश आणि नेपाळ सारखा भारताचा शेजारी देश यांना आपल्या कह्यात ठेवून वेगळे राजकारण साधू इच्छित आहे किंबहुना भारतावर दबाव वाढवू इच्छित आहे.

    या पार्श्वभूमीवरच नेपाळ मधले आजचे सत्तांतर महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पुष्प कमल दहल आणि के. पी. शर्मा ओली हे दोन्ही नेते भारत विरोधी आणि चीन समर्थक मानले जातात. आगामी 5 वर्षांसाठी त्यांच्यात राजकीय सत्तेचा करार होऊन ते आलटून पालटून पंतप्रधान बनणार असतील, तर भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी विभागीय पातळीवर एक मोठा धोका आणि धक्का असू शकतो.

    भारत 2023 मध्ये ज्यावेळी विकसित आणि विकसनशील राष्ट्रांची संघटना ग्रुप 20 अर्थात g20 ची अध्यक्षता करत आहे, त्यावेळी नेपाळ सारख्या छोट्या देशात सत्तांतर होऊन चीन समर्थक नेते पंतप्रधान होणे ही भारतासाठी सतर्कतेची किंबहुना धोक्याची घंटा मानली पाहिजे.

    Pro-China leader Pushpa Kamal Dahal as prime minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!