• Download App
    मोदींच्या दुबार काशी दौऱ्याचा राजकीय मुहूर्त साधत अयोध्येतील जमीन खरेदीवरून प्रियांका गांधींचा निशाणा!! । Priyanka Gandhi's target from land purchase in Ayodhya during the political moment of Modi's double visit to Kashi !!

    मोदींच्या दुबार काशी दौऱ्याचा राजकीय मुहूर्त साधत अयोध्येतील जमीन खरेदीवरून प्रियांका गांधींचा निशाणा!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा काशीच्या दौऱ्यावर आहेत. तेथे सुमारे 837 कोटी रुपयांच्या विविध 22 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास मोदींच्या हस्ते होत आहे. मोदींच्या या दुबार काशी दौऱ्याचा राजकीय मुहूर्त साधत प्रियांका गांधी यांनी अयोध्येतील जमीन खरेदी वरून उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. Priyanka Gandhi’s target from land purchase in Ayodhya during the political moment of Modi’s double visit to Kashi !!

    अयोध्ये मध्ये राम मंदिर बांधण्याला अनुकूल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर आमदार, खासदार,सनदी अधिकारी यांच्या नातेवाईकांनी अयोध्या आणि परिसरात जमीन खरेदी करण्याचा सपाटा लावला. या संदर्भातल्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर काल प्रथम ज्येष्ठ चरित्रका विचारवंत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात ट्विट केले. त्यानंतर सुमारे चार तासांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी या बातमीवरून ट्विट केले. आज प्रियंका गांधी यांनी याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन योगी सरकारवर निशाणा साधला आहे.



    अयोध्येमधल्या जमिनी कवडीमोल भावाने भाजपच्या खासदार, आमदार यांच्या नातेवाईकांनी तसेच काही सनदी अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने या जमीन खरेदी बाबत राज्याच्या महसूल आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. येत्या पाच दिवसांमध्ये त्यांना जमीन खरेदी बाबतचे अहवाल सादर करायला सांगितले आहे.

    मात्र त्यावर प्रियांका गांधी यांचे समाधान झालेले नाही. पत्रकार परिषदेत प्रियांका गांधी म्हणाल्या, की आयोध्येत राममंदिर बांधण्यात संदर्भातला निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तेथील जमीन खरेदी बाबतचे व्यवहार जिल्हा स्तरावरच्या सरकारी अधिकार्याकडून तपासण्यात काहीच मतलब नाही. तर सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली या खरेदी व्यवहाराची नि:ष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशीच्या दुबार दौऱ्यावर आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केल्यानंतर दोन दिवस ते काशीवास करून होते. आज ते पुन्हा काशीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते आज विविध विकास प्रकल्पांचे शिलान्यास आणि उद्घाटन होत आहेत. नेमका हाच राजकीय मुहूर्त साधून प्रियांका गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत अयोध्येतील जमीन खरेदी वरून योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधून घेतला आहे.

    Priyanka Gandhi’s target from land purchase in Ayodhya during the political moment of Modi’s double visit to Kashi !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज