• Download App
    लडकी हूॅँ लड सकती हूॅँ म्हणणारी प्रियंका गांधींची पोस्टर गर्लच भाजपमध्ये प्रवेश करणार|Priyanka Gandhi's poster girl who says I can fight as a girl will join BJP

    लडकी हूँ लड सकती हूँ म्हणणारी प्रियंका गांधींची पोस्टर गर्लच भाजपमध्ये प्रवेश करणार

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात लडकी हूॅँ, लड सकती हूॅँ असे म्हणत उत्तर प्रदेशात प्रचार सुरू केला आहे. राज्यात अनेक होर्डींग्जही लावण्यात आले आहेत. मात्र, या पोस्टरवरील पोस्टरगर्लनेच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.Priyanka Gandhi’s poster girl who says I can fight as a girl will join BJP

    महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. प्रियंका मौर्य या काँग्रेसच्या लडकी हूँ, लड सकती हूँ… या कॅम्पेनच्या पोस्टर गर्ल आहेत. या कॅम्पेनच्या जाहिरातीवर त्यांचा फोटो झळकला आहे. त्यामुळे, त्या प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जात. मात्र, आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.



    डॉ. प्रियंका मौर्य भाजपात प्रवेश करणार आहेत. लखनौ येथील भाजप कार्यालयात जाऊन त्या भाजप प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर त्यांनी नाराजी व्यक्त करत गंभीर आरोपही केले आहेत. प्रियंका गांधी वाड्रा यांचे सचिव संदीप सिंह यांनी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारीचं तिकीट देण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

    काँग्रेसने माझ्या नावाचा, चेहऱ्याचा आणि 10 लाख फॉलोअर्सचा वापर करुन घेतला. मात्र, तिकीट देतेवेळी मला सचिव संदीप सिंह यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. मी पैसे न दिल्यानेच माझे तिकीट कापण्यात आल्याचे प्रियंका मौर्य यांनी म्हटले आहे. या सगळ्यांचे पुरावेही आपल्याकडे आहेत, वेळ आल्यात ते सादर करेने, असेही त्या म्हणाल्या.

    Priyanka Gandhi’s poster girl who says I can fight as a girl will join BJP

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार