• Download App
    प्रियंका गांधी यांची बोलाचीच कढी, बोलचाच भात, म्हणे सत्तेत आल्यावर मुलींना मोफत स्मार्ट फोन, स्कुटी देऊ|Priyanka Gandhi's anoncement, will give free smart phones, scooties to girls

    प्रियंका गांधी यांची बोलाचीच कढी, बोलचाच भात, म्हणे सत्तेत आल्यावर मुलींना मोफत स्मार्ट फोन, स्कुटी देऊ

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्याही जागा मिळणार नसल्याची कॉंग्रेसला खात्री आहे.जणू ही खात्री असल्यानेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी घोषणांचा धडाका सुरू केला आहे. आता त्यांनी उत्तर प्रदेशातील मुलींना मोफत स्कुटी आणि स्मार्टफोन देण्याची घोषणा केली आहे.Priyanka Gandhi’s anoncement, will give free smart phones, scooties to girls

    आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यास राज्यातील मुलींना मोफत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येतील, असे सांगून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या, काल मी काही मुलींना भेटले. त्यांनी सांगितले की त्यांना शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी स्मार्टफोनची गरज आहे.



    आज घोषणा समितीच्या संमतीने उत्तर प्रदेश काँग्रेसने ठरवले आहे की जर राज्यात पक्षाचे सरकार स्थापन झाले तर १० पास झालेल्या मुलींना स्मार्टफोन दिले जातील आणि पदवीधर मुलींना इलेक्ट्रिक स्कूटी दिल्या जातील.

    प्रियंका यांनी ट्विटमध्ये काही विद्यार्थिनींचा एका पत्रकाराशी बोलतानाचा व्हिडिओ देखील टॅग केला आहे. ज्यात मुली प्रियंका गांधींसोबत फोटो काढत आहेत. एका मुलीने सांगितलं की, प्रियंका यांनी आम्हाला सेल्फी घ्यायचा आहे का? असं विचारलं. तेव्हा तुमच्याकडे फोन आहे की अशी विचारणा केली. यावर, आम्ही सांगितले की आमच्याकडे फोन नाही आणि कॉलेजमध्ये फोन आणण्याची परवानगी नाही.

    यावर प्रियंका म्हणाल्या की आपण मुलींना फोन मिळावेत अशी घोषणा आम्ही करावी का?, तर मुली म्हणाल्या यापेक्षा चांगले काय असू शकते.दोन दिवसांपूर्वीच प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतील अशी घोषणा केली होती.

    Priyanka Gandhi’s anoncement, will give free smart phones, scooties to girls

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती