• Download App
    प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काढणार १२ हजार किलोमीटरची प्रतिज्ञा यात्रा, गेल्या वेळीचा सातचा आकडा वाढविण्याचे आव्हान|Priyanka Gandhi to undertake 12,000 km pledge yatra in Uttar Pradesh

    प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काढणार १२ हजार किलोमीटरची प्रतिज्ञा यात्रा, गेल्या वेळीचा सातचा आकडा वाढविण्याचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत ४०३ पैकी केवळ सात जागा मिळविल्या होत्या. या जागा वाढविण्याचे आव्हान असलेल्या कॉँगेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी १२ हजार किलोमीटरची प्रतिज्ञायात्रा काढणार आहेत.Priyanka Gandhi to undertake 12,000 km pledge yatra in Uttar Pradesh

    उत्तर प्रदेश कॉँग्रेसच्या सल्लागार आणि रणनीती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रतिज्ञा यात्रा- हम वचन निभायेंगे नावाने हा उपक्रम राबविला जाणारआहे. सुमारे १२ हजार किलोमीटरच्या प्रवासात उत्तर प्रदेशातील अनेक शहरे आणि गावांतून ही यात्रा जाणार आहे. ही यात्रा मतदारांना आश्वासन देण्याकरता आहे की पक्ष निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करेल.



    उत्तर प्रदेशच्या प्रभारी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पक्षाच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी गांधी दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत. कॉँग्रेसने झोननिहाय निवडणूक प्रचार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांकडून माहिती घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद उपस्थित होते. पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तयार करण्याच्या उद्देशाने खुर्शीद उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना भेटी देत आहेत. समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत, असे वृत्तपत्राने म्हटले आहे.

    काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांच्यासह खुर्शीद यांनी नुकतीच गोरखपूरमध्ये होते रिक्षाचालक, रेल्वे कर्मचारी, मजुरांसह इतरांना भेटून त्यांच्या समस्या आणि चिंता जाणून घेतल्या. त्याचबरोबर अलिगढ येथे जाहीर संवादही आयोजित केला होता.लखनौमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामानंतर प्रियंका गांंधी आपल्या आई सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीला जाणार आहे. तेथील काही गावांना त्या भेट देणार आहेत.

    Priyanka Gandhi to undertake 12,000 km pledge yatra in Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार