विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे प्रियांका गांधींच्या विजयावर महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे प्रियांका मात्र अमित शाहांचे आभार मानून मोकळ्या झाल्या!!
याची कहाणी अशी :
प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून जिंकून आल्या त्यानंतर कमनीस पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मुस्लिम कट्टरतावादी संघटनांमुळे प्रियांका गांधींचा वायनाड मध्ये विजय झाल्याचा आरोप कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य ए. विजय राघवन यांनी केला. त्यावर काँग्रेस नेते काही बोलले नाहीत, पण महाराष्ट्रात भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी त्याच आरोपाचा पुनरूच्चार केल्याबरोबर बाळासाहेब थोरात आणि अतुल लोंढे हे नेते भडकले आणि त्यांनी नितेश राणे यांना ठोकून काढले. भाजपच्या मंत्र्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडण्याचा आरोप त्यांनी केला.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
पण दुसरीकडे प्रियांका गांधी मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानून मोकळ्या झाल्या. वायनाड मध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दरड दुर्घटनेला अमित शाह यांनी नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केले. त्यामुळे सरकारी निधीतून तिथल्या पीडित लोकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला. याबद्दल प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट लिहित अमित शाह यांचे आभार मानले. त्याचवेळी पीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.