• Download App
    योगींचे सरकार म्हणजे खोट्या जाहिरातींचे आणि हवेतील दाव्यांचे सरकार – प्रियांका यांची टीका । Priyanka Gandhi targets Yogi govt.

    योगींचे सरकार म्हणजे खोट्या जाहिरातींचे आणि हवेतील दाव्यांचे सरकार – प्रियांका यांची टीका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केलेले ट्विट भाजपला चांगलेच झोंबले आहे. त्यांनी हिंदीत ट्विट केले आहे. भाजपला लक्ष्य करीत त्यांनी म्हटले आहे की, खोट्या जाहिराती देणे हेच त्यांचे काम आहे. बोगस लेखापाल बनवून त्यांनी उत्तर प्रदेशच्या युवकांना रोजगार देण्याचा खोटेपणा केला. आता उड्डाणपूल आणि कारखान्यांची चुकीची व बोगस छायाचित्रे दाखवून विकासाचे खोटे दावे केले जात आहेत. ह्यांना ना जनतेचे प्रश्न समजतात ना त्याच्याशी काही देणेघेणे आहे…हे फक्त खोट्या जाहिरातींचे आणि हवेतील दाव्यांचे सरकार आहे. Priyanka Gandhi targets Yogi govt.



    उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहिरातीमध्ये तृणमूल काँग्रेसने बांधलेल्या पुलाचे छायाचित्र झळकल्याचा संदर्भ या टीकेला आहे. प्रियांका यांच्या काँग्रेसने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाशी युती केली होती. अशावेळी भाजपवर टीका करण्यासाठी त्यांनी तृणमूलच्या पथ्यावर पडलेल्या विषयाचा आधार घेणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

    Priyanka Gandhi targets Yogi govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Becomes Ukraine : भारत युक्रेनचा सर्वात मोठा डिझेल पुरवठादार बनला; जुलैमध्ये दररोज 2,700 टन डिझेल विकले

    Kiren Rijiju : राहुल यांचे नाव न घेता रिजिजू म्हणाले- त्यांना चर्चा नकोय; हा फक्त पॉलिटिकल ड्रामा

    US Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कांमुळे पंजाबला 30,000 कोटी रुपयांचे नुकसान; कापड निर्यातीत 8,000 कोटींचा फटका