प्रियांका गांधी रमल्या गोव्याच्या मोरपिलात आदिवासी नृत्यामध्ये!!
प्रतिनिधी
पणजी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून गोव्याच्या दौऱ्यावर असून त्या आपल्या पहिल्याच कार्यक्रमात गोव्यातील मोरपिलात आदिवासी नृत्यामध्ये रमून गेल्या. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातून जरी जोरदार टीका टिपण्णी होत असली तरी प्रियांका गांधी यांनी या कार्यक्रमातला एक वेगळा फोटो शेअर केला आहे.Priyanka Gandhi shares special photo in goa morpila
एमेलिया मेरी फर्नांडिस या आजीचा तो फोटो आहे. या आजी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता प्रियांका गांधी अशा गांधी परिवाराच्या तीन पिढ्यांना भेटल्या आहेत. प्रियंका गांधी यांनी हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर विशेष कँप्शनसह शेअर केला आहे.
प्रियांका गांधी यांचा गोव्याचा राजकीय दौरा असला तरी त्याची सुरुवात त्यांनी मोरपिला सारख्या छोट्या गावातून केली आहे. तेथे त्यांनी आदिवासी महिलांना संबोधित केले. त्याच वेळी आदिवासी महिलांनी सादर केलेल्या पारंपारिक नृत्यांमध्ये देखील त्या अत्यानंदाने सहभागी झाल्या.
या आपल्या कार्यक्रमाचे फोटो प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केले असून त्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण फोटोदेखील आहे. प्रियांका गांधी यांनी एमिलिया फर्नांडिस यांच्या बरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे, की एमेलिया मेरी फर्नांडिस या माझी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांना देखील भेटल्या आहेत. आज या आजींना भेटून मला अतिशय आनंद झाला आहे. एमिलिया फर्नांडिस यांचे प्रियांका गांधी यांना भेटल्यानंतर गांधी परिवाराच्या तीन पिढ्यांचे नाते जोडले गेले आहे.
Priyanka Gandhi shares special photo in goa morpila
महत्त्वाच्या बातम्या
- टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क म्हणतात, मी माझे सीईओ पद सोडून, इन्फल्यूएन्सर बनण्याचा विचार करत आहे
- जनरल रावत यांना निरोप देताना अवघा देश शोकसागरात, प्रियांका गांधी मात्र गोव्यात निवडणूक प्रचारात व्यग्र, स्थानिकांसोबत केले नृत्य
- WATCH : कांद्याने केला वांदा ; डोळ्यात आले पाणी कांदा उत्पादक शेतकरी सापडले संकटात
- समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांविरुद्ध इथून पुढे आरोप केले जाणार नाहीत ; नवाब मलिक