वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनची बाजू उचलून धरून भारतीय सैन्य दलांवर टीका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचे कान उपटले. सच्चा भारतीय असली वक्तव्ये करणार नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना फटकारले. त्याबरोबर राहुल गांधींच्या भगिनी खासदार प्रियांका गांधी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवरच भडकल्या. करा आणि खोटा भारतीय कोण हे तुम्ही नाही ठरवू शकत, असे म्हणाल्या. Priyanka Gandhi
गलवान संघर्ष दरम्यान राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्या संबंधाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. चीनने भारताचे 2000 वर्ग किलोमीटर भूमी बळकावली. त्यावेळी सरकार काय झोपले होते का?, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींच्या वक्तव्यावर लखनऊ न्यायालयात केस दाखल झाली. लखनऊ न्यायालयाने त्यांना समन्स बजावले. त्या विरोधात राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले.
सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींचे कामे उपटले. चीनने भारताची 2000 वर्ग किलोमीटर भूमी बळकावली, असे तुम्ही म्हणताय, तुम्ही प्रत्यक्ष तिथे होतात का?, तुमच्याकडे काय पुरावा आहे?, सच्चा भारतीय असली वक्तव्ये करून सैन्यदलाचे मनोबल घटवणार नाही अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना फटकारले.
मात्र, त्याविषयी शरम वाटून स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी राहुल गांधींच्या भगिनी खासदार प्रियांका गांधी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवरच भडकल्या. खरा किंवा खोटा भारतीय कोण?, हे न्यायाधीश ठरवू शकत नाहीत, असे म्हणाल्या. राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत. ते सरकारला प्रश्न विचारतात पण सरकार संसद चालूच देत नाही.
राहुल गांधींनी प्रश्न विचारलेले सरकारला आवडत नाही म्हणून सरकार कुणा मार्फत असला प्रकार करते. न्यायपालिकेविषयी आदर बाळगून सुद्धा मी असे म्हणेन खरा आणि खोटा भारतीय कोण हे न्यायाधीश ठरवू शकत नाहीत, अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवर आगपाखड केली.
Priyanka Gandhi lashes out at Supreme Court judges; You cannot decide who is a real or fake Indian, she said!!
महत्वाच्या बातम्या
- कम्युनिस्टांकडून गुन्हेगारांना लाल सलाम?’ भाजप खासदार सदानंदन मास्टर यांचे पाय कापणाऱ्यांना जेलमध्ये जाण्यापूर्वी जल्लोषात निरोप
- भगवान श्रीकृष्ण हे पहिले मध्यस्थ; सरकार आणि गोस्वामी समाजाला सौहार्दातून तोडगा काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
- भारत रशियाचे तेल घेऊन विकतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड; भारतावर ज्यादा टेरिफ लादायची पुन्हा धमकी!!
- Sukh Chahal : खलिस्तानविरोधी कार्यकर्त्याचा अमेरिकेत मृत्यू; खलिस्तानी समर्थकांकडून मिळत होत्या धमक्या