विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Priyanka Gandhi हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्ष कार्यकारिणीचे झालेल्या पहिल्याच बैठकीत नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी इथून पुढच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐवजी बॅलेट पेपर वरच घेण्याची वकिली केली. कुठलीही निवडणूक घ्यायला इथून पुढे बॅलेट पेपर शिवाय दुसरा पर्याय असता कामा नये, असे त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला सुनावले. राहुल गांधींनी देखील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण करावे लागेल, असा इशारा दिला. Priyanka Gandhi elections on ballot papers at CWC meeting
गांधी बहीण – भावंडांच्या भाषणानंतर काँग्रेस कार्यकारिणीमध्ये मध्ये बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर आग्रही ठराव येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात असा कुठलाही ठराव काँग्रेस कार्यकारिणीने थेटपणे करण्याचे टाळले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे, पण त्या आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोलणे भाग पडू शकेल, असा पुसटचा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यातून त्यांनी कायदेशीर पेचप्रसंग टाळला.
राहुल गांधी बॅलेट पेपर यात्रा काढण्याच्या तयारीत असताना काँग्रेस कार्यकारिणीने एक मुखाने आपल्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात कार्यकारिणीने सावध भूमिका घेत धीमी पावले टाकण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला. कारण सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरुद्ध बॅलेट पेपर या लढाईत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची बाजू घेत बॅलेट पेपरवरची निवडणूक नुकतीच फेटाळून लावली होती.
हरियाणा + महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी राहुल, प्रियांकांवर टाकायला CWC चा नकार
लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स झाल्यावर देखील हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. पण त्या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि राष्ट्रीय नेतृत्वावर टाकायला काँग्रेस कार्यकारिणीने टाळले. उलट काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी झापले.
तुम्ही किती दिवस राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि राष्ट्रीय नेत्यांवर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रदेशांच्या निवडणुका लढवणार??, असा खोचक सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रदेश नेत्यांना केला. काँग्रेस मधले अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांची एकमेकांविरुद्धची वक्तव्येच पराभवाला कारणीभूत ठरतात, अशा शब्दांमध्ये खर्गे यांनी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना झापले.
Priyanka Gandhi elections on ballot papers at CWC meeting
महत्वाच्या बातम्या
- Sharad pawar मास्टर माईंड + जरांगेंचे नेहमीच माध्यमांमध्ये “मास्टर स्ट्रोक”; पण ऐनवेळी अवसानघातातून बाउंड्री वर कॅच आऊट!!
- Waqf कायद्यात सुधारणेत विरोधकांचा अडथळा; सततच्या बहिष्कारमुळे Waqf JPC वर मुदतवाढ मागायची वेळ!!
- Manipur violence : मणिपूर हिंसाचाराशी संबंधित 3 प्रकरणांचा तपास NIAने हाती घेतला
- Bangladesh : बांगलादेशात इस्कॉन धर्मगुरूंच्या अटकेमुळे भारत नाराज; म्हटले- गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत, हक्क मागणारे जेलमध्ये