प्रतिनिधी
नवी दिल्ली : हा देश शेतकऱ्यांचा आहे. भाजपची जहागीरदारी नाही. पोलिसांची मला रोखण्याची हिंमतच कशी होते? मी काही अपराध करायला लखीमपूर खीरी कडे चालले नव्हते. त्यांनी मला अडवले. हे मी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारचे वाभाडे काढले.Priyanka Gandhi attacked the police, rained down on the BJP
पोलिसांवरही त्यांनी आगपाखड केली. मला अडवण्याची किंवा प्रतिबंध करण्याची ऑर्डर पोलिसांकडे नव्हती तरीही त्यांची हिंमत कशी झाली? मी पोलिसांना ऑर्डर मागितली तर त्यांनी आपली तोंडे लपवली. जर त्यांच्याकडे ऑर्डर होती तर त्यांना तोंड लपवण्याची काय गरज होती?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला.
हा देश शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांनी तो सुजलाम-सुफलाम केला आहे. ही भाजपची जहागीरदारी नाही. त्यांना शेतकऱ्यांना संपवायचे आहे. इथे मुठभर भांडवलदारांचे राज्य आणायचे आहे. पण या देशातला शेतकरी आणि आम्ही हे घडू देणार नाही, असा इशाराही प्रियंका गांधी यांनी दिला.
प्रियंका गांधी यांनी आपल्या गाडीमध्ये एक व्हिडिओ काढून तो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्याची माहिती दिली आहे आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला आहे.
Priyanka Gandhi attacked the police, rained down on the BJP
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कॉँग्रेसला बसणार दणका, माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर
- अमिताभ बच्चन यांनी केले गडकरींच्या तारुण्याचे कौतुक, गडकरींनी सांगितले त्यांना रहस्य
- अमेरिकेत कोरोनाचा पुन्हा कहर, आयसीयूमध्ये रुग्णांसाठी जागा नाही
- मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान, अजित पवार यांची आर्यन खान अटकेवर प्रतिक्रिया