• Download App
    ''बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी देश प्रार्थना करत होता, तेव्हा प्रियांका आणि राहुल...'' |Priyanka and Rahul dance as nation prays for tunnel workers Himanta Biswa Sarma

    ”बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी देश प्रार्थना करत होता, तेव्हा प्रियांका आणि राहुल…”

    • मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, ”संपूर्ण देश उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या कामगारांबद्दल चिंतेत असताना आणि त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रार्थना करत असताना, तेलंगणामध्ये दोघे भाऊ-बहीण “डान्स” करत होते.”Priyanka and Rahul dance as nation prays for tunnel workers Himanta Biswa Sarma



    मुख्यमंत्री शर्मा यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “मंगळवार सकाळपासून बचाव कार्यात काही यश मिळेल अशी आशा होती आणि आम्ही सर्व काळजीत होतो. मला तेलंगणातील निवडणूक रॅलींना हजेरी लावायची होती, पण मी गेलो नाही.”

    ‘भारताच्या विजयावर संपूर्ण देश आनंदित झाला, पण ‘मोहब्बत की दुकान’…’, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा टोला

    शर्मा यांनी दावा केला, “आम्ही दिवसभर काळजीत होतो, पण राहुल आणि प्रियांका दोघेही तेलंगणात ‘डान्स’ करत होते. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळीही त्यांनी असेच केले होते.” असे ‘संवेदनहीन आणि अमानुष नेतृत्व देशाने पाहिलेले नाही आणि सध्याच्या काँग्रेस नेत्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही’, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

    शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे ”26/11 असो किंवा इतर कोणताही महत्त्वाचा प्रसंग असो, या कुटुंबासाठी मनोरंजनाला नेहमीच प्रथम प्राधान्य असते.”

    Priyanka and Rahul dance as nation prays for tunnel workers Himanta Biswa Sarma

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे