• Download App
    गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड । Priya Malick Wons Gold At World Cadet Wrestling Championship 2021 Indian Women's Team Won 3 Gold And 2 Bronze Medals

    गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड

    Priya Malick Wons Gold : बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने 73 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारतीय मुलींनी 3 सुवर्णांसह एकूण 5 पदके जिंकली. प्रियाच्या विजयानंतर भारताच्या काही चाहत्यांमध्ये असा गैरसमज निर्माण झाला की, तिला ऑलिम्पिकमध्येच गोल्ड मिळालं आहे. सोशल मीडियावर तर युजर्सनी तशा आशयाचा पोस्टचा अक्षरश: पाऊसच पाडला आहे. Priya Malick Wons Gold At World Cadet Wrestling Championship 2021 Indian Women’s Team Won 3 Gold And 2 Bronze Medals


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने 73 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारतीय मुलींनी 3 सुवर्णांसह एकूण 5 पदके जिंकली. प्रियाच्या विजयानंतर भारताच्या काही चाहत्यांमध्ये असा गैरसमज निर्माण झाला की, तिला ऑलिम्पिकमध्येच गोल्ड मिळालं आहे. सोशल मीडियावर तर युजर्सनी तशा आशयाचा पोस्टचा अक्षरश: पाऊसच पाडला आहे.

    अंतिम फेरीत प्रियाने बोलारूसच्या कुस्तीपटूचा 5-0 असा पराभव केला. प्रिया व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय पहिलवानांनी सुवर्ण, तर दोन कुस्तीगीरांनी कांस्यपदक जिंकले. तन्नूने 43 किलो व कोमलने 46 किलो गटामध्ये सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे वर्षाने 65 किलो वजनात कांस्यपदक जिंकले आणि अखेरच्या कुस्तीपटूने 53 किलो गटात ब्राँझ जिंकले. या चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मुलींच्या गटाची कामगिरी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अमेरिकन संघ प्रथम आला आणि रशियन संघ तिसऱ्या क्रमांकावर आला.

    1 ऑगस्टपासून ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धा

    टोकियो ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यावेळी भारतातील 7 पहिलवान सहभागी होत आहेत. महिलांमध्ये विनेश फोगट आणि पुरुषांमध्ये बजरंग पुनिया यांनी पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. विनेशशिवाय सीमा बिस्ला, सोनम मलिक आणि अंशु मलिक ऑलिम्पिकमध्येही सहभागी होत आहेत. पुरुषांमध्ये बजरंग व्यतिरिक्त दीपक पूनिया, रवी कुमार दहिया सहभागी होत आहेत.

    कॅडेट वर्ग म्हणजे काय

    15 ते 17 वयोगटातील खेळाडू कॅडेटमध्ये भाग घेऊ शकतात. कुस्तीतील जागतिक कॅडेट चँपियनशिपमध्ये 10-10 वजन गटांचा समावेश आहे.

    मीराबाई चानूने टोकियोत भारतासाठी पहिले पदक जिंकले

    शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने देशातील पहिले पदक जिंकले. 21 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये तिने पदक जिंकले आहे. तिच्या अगोदर 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरीने देशासाठी वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

    Priya Malick Wons Gold At World Cadet Wrestling Championship 2021 Indian Women’s Team Won 3 Gold And 2 Bronze Medals

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती