• Download App
    हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या पुनरुत्थानात गैर काय??; अक्षय कुमार, चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा परखड सवालprithviraj : prithviraj : What's wrong with the revival of Hindu cultural nationalism ??;

    सम्राट पृथ्वीराज : हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या पुनरुत्थानात गैर काय??; अक्षय कुमार, चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा परखड सवाल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पुनरुत्थान भारतात होत असेल तर त्यात गैर काय?, असा परखड सवाल प्रख्यात दिग्दर्शक आणि अभ्यासक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केला आहे. भारतीय आपला हजारो वर्षांचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा प्रकाशात आणू इच्छित असतील तर ते स्वीकारले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. What’s wrong with the revival of Hindu cultural nationalism ??; prithviraj : Hard question from Akshay Kumar, Chandra Prakash Dwivedi

    सम्राट पृथ्वीराज सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार आणि चंद्रप्रकाश द्विवेदी यांची खास मुलाखत एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी घेतली. या मुलाखतीत हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर डॉ. द्विवेदी आणि अक्षय कुमार यांनी परखड मते व्यक्त केली. गेली 70 वर्षे भारतीय इतिहासाकडे केवळ डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांच्या दृष्टिकोनातूनच पाहिले गेले. लिहिले गेले. त्यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला त्याच दृष्टिकोनातून मोगलांचा, भारतीय सम्राटांचा, राजा महाराजांचा इतिहास लिहिला गेला. मुगल सम्राटांना महान ठरवताना भारतीय सम्राटांना, राजा महाराजांना दुय्यम स्थान दिले. हे जर आता बदलत असेल एका समदृष्टीने आणि भारताच्या गौरवाच्या दृष्टीने इतिहासाकडे पाहिले जात असेल तर त्यामध्ये गैर काय आहे??, असा सवाल अक्षय कुमार आणि चंद्रप्रकाश द्विवेदी या दोघांनी केला आहे.

     

    परंतु हे हिंदू राष्ट्रवादाचे पुनरुत्थान नाही का??, त्यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्षतेला तडा जात नाही का?? असे सवाल स्मिता प्रकाश यांनी केले त्यावर चंद्रप्रकाश दिवेदी यांनी सविस्तर उत्तर दिले. ते म्हणाले, की काशी विश्वनाथ भारताची संस्कृती राजधानी आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग, राम जन्मभूमी, गंगा, यमुना, सप्त नद्या ही भारताची सांस्कृतिक ओळख आहे. या देशाचा मूलभूत राष्ट्रवाद हिंदू आहे. पण तो गेल्या 75 वर्षात पुसण्यात आला. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्याला विशिष्ट वळण लावण्यात आले. भारतीयांना गौरवान्वित करणारा इतिहास बाजूला ठेवण्यात आला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    – सोमनाथ जीर्णोद्धाराला नेहरूंचा विरोध

    पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध करून देखील सरदार वल्लभाई पटेल, कन्हैयालाल मुन्शी यांच्यासारख्या नेत्यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. कारण भारताची सांस्कृतिक ओळख त्यामध्ये असल्याची त्यांची धारणा होती. ज्या मुघलांनी आक्रमण करून मंदिरे उध्वस्त केली, धर्मांतरे घडवली त्या मोगलांचा इतिहास भारतीयांवर थोपवण्यात काय मतलब होता?? पण तो थोपवला. आता तो नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. स्वीकार केला पाहिजे. कारण भारतीय राष्ट्रवादाचे मूलभूत स्वरूप हिंदू आहे आणि ते स्वीकारताना कोठेही अपराधी भावना असता कामा नये. आमची तशी भावना अजिबात नाही, असेही चंद्रप्रकाश द्विवेदी आणि अक्षय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

    prithviraj : What’s wrong with the revival of Hindu cultural nationalism ??; Hard question from Akshay Kumar, Chandra Prakash Dwivedi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Indigo : इंडिगोवर ₹458 कोटींहून अधिकचा जीएसटी दंड; एअरलाइनने म्हटले- आदेशाला आव्हान देणार

    Ujjain Mahakal : उज्जैन महाकाल दर्शन घेऊन नुसरत भरुचा वादात; ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष म्हणाले- हा शरियतच्या दृष्टीने गुन्हा, तौबा करा, कलमा वाचा

    Army Animal : प्रजासत्ताक दिनी सैन्याची पशु तुकडी देखील परेड करणार; बॅक्ट्रियन उंट, झांस्कर टट्टू, रॅप्टर्स आणि श्वान मार्च करतील