विशेष प्रतिनिधी
पंजाब : कर्नल प्रीथीपाल सिंग गिल हे भारतीय सरंक्षण दलातील तिन्ही दलात इंडियन ऑफिसर होते. यांचे नुकतेच निधन झाले आहे. 5 डिसेंबर रोजी रविवारी त्यांचे निधन झाले. हे असे इंडियन ऑफिसर होते ज्यांनी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्ही दलांमध्ये काम केले आहे. 11 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस. आज जर ते जिवंत असते तर 11 डिसेंबर रोजी 101 वर्षांचे झाले असते.
prithipal-singh-gill-who-served-in-all-the-three-divisions-of-the-indian-defense-forces-has-passed-away
त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1942 साली केली. रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये ते भरती झाले होते. फ्लाईट कॅडेट म्हणून त्यांनी कराचीमध्ये आपले काम सुरू केले होते. पण त्यांच्या वडिलांना हे काम धोक्याचे वाटले त्यामुळे त्यांनी त्यांना इंडियन नेव्ही मध्ये जॉइन होण्यास सांगितले.
इंडियन नेव्हीमध्ये त्यांनी पाच वर्षे काम केले. यावेळी त्यांनी खान साफ करणारी जहाजे, त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या मालवाहू जहाजामध्ये देखील काम केले होते. आर्मी ऑफिसर म्हणून ते रेजिमेंट ऑफ आर्टिलरी मध्ये तैनात होते. 1965 च्या भारत पाक युद्धात त्यांच्या नेतृत्वाखाली 71 मध्यम रेजिमेंटमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
अशा या विर योद्धय़ाला इंटरनेटवर सर्व जण श्रद्धांजली वाहत आहेत. देशा साठी असे वीर योध्ये दिवसरात्र काम करत असतात म्हणून आपण सर्वजण एक सुखी आणि शांततेचे आयुष्य जगतो. कर्नल प्रीथीपाल सिंग गिल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
prithipal-singh-gill-who-served-in-all-the-three-divisions-of-the-indian-defense-forces-has-passed-away
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टी सोडण्यासाठी मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची ऑफर; खासदार भगवंत मान यांचा खळबळजनक दावा!!
- पंचगंगा नदीमध्ये फेस आढळून आला
- शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा
- शिक्षकांच्या मोर्चावर लाठी चार्ज : उत्तर प्रदेशमधील ६९००० सहाय्यक शिक्षकांच्या शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कॅडल मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज