वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, प्राप्तिकर खाते – आयटी, सीबीआय आणि अन्य तपास संस्थांचा गैरवापर करत आहेच, ते फोन टॅपिंगही करतात. पण आता माझ्या मुलांची देखील इंस्टाग्राम अकाउंटस् ते हॅक करत आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे. prinayaka gandhi had alleged that the government is hacking Instagram accounts of her children
प्रियांका गांधींच्या या आरोपांची केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून लवकरच या आरोपांसंदर्भात चौकशी करण्यात करण्यात येईल, असे सरकारी सूत्रांनी आज स्पष्ट केले आहे. प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक करण्याचा आरोप करून नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. त्या लखनऊ मध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नातेवाईकांवर ईडी आणि आयटीचे छापे पडत आहेत. याबाबत प्रश्न विचारले असता प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
प्रियांका गांधी यांच्या याच तक्रारीची केंद्र सरकारने दखल घेतली असून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्रालय यासंदर्भात योग्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करेल आणि त्यातली सत्यता तपासून योग्य ती कायदेशीर कारवाई करेल, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे
prinayaka gandhi had alleged that the government is hacking Instagram accounts of her children
महत्त्वाच्या बातम्या
- बीज बँक प्रत्येक गावागावात साकारा; बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन
- WINTER SESSION : आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; त्यापूर्वीच 8 जणांना कोरोनाची लागण ; अध्यक्ष निवडीसाठी भाजप कॉंग्रेस आक्रमक
- PAKISTAN : इशनिंदेला फाशीची शिक्षा ? कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून पुन्हा हिंदूं मंदिराची -मूर्तींची तोडफोड-२२ महिन्यात ९ मंदिरांवर आक्रमणे