• Download App
    नागपूरला पंतप्रधानांचे 11 विकास नक्षत्रांची भेट; आमदनी अठन्नी खर्चा रूपया शॉर्टकट राजकारणावर जोरदार हल्लाबोल Prime Minister's visit to 11 Vikas Nakshatras in Nagpur

    नागपूरला पंतप्रधानांचे 11 विकास नक्षत्रांची भेट; आमदनी अठन्नी खर्चा रूपया शॉर्टकट राजकारणावर जोरदार हल्लाबोल

    प्रतिनिधी

    नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ते नागपूर एम्स अशा विविध 11 विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाची भेट नागपूरकरांना दिली आहे. 11 विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांचे असते आज नागपूर मध्ये झाले. सुमारे 75000 कोटी रुपयांची ही विकास कामे आहेत. यावेळी झालेल्या समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या आमदानी अठन्नी खर्चा रुपय्या शॉर्टकट अशा राजकारणावर जोरदार शरसंधान साधले. Prime Minister’s visit to 11 Vikas Nakshatras in Nagpur

    पंतप्रधान मोदी म्हणाले, की भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकालात प्रवेश करताना चौथी औद्योगिक क्रांती आली आहे. या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे संधी भारत गमावणार नाही. सबका साथ सबका विकास या मंत्राने विकास करताना मी त्याला सबका प्रयास असा मंत्र जोडला आहे. याचा अर्थ प्रत्येक छोटा मोठा भारतीय या विकास यात्रेत सहभागी झाला पाहिजे. पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीची संधी त्या वेळच्या स्वस्थ आणि सुस्त बसलेल्या सरकारांनी गमावली. परंतु आता ही संधी गमावून चालणार नाही. कारण छोटे अरब देश आणि सिंगापूर सारखा छोटा देश देखील या औद्योगिक क्रांतीमुळे विकसित होऊ शकले, तर भारतासारखा विशाल काय देश का मागे राहिला?, याचा आपण विचार केला पाहिजे. आता कोणत्याही शॉर्टकट राजकारणातून देशाचा विकास करण्याची संकल्पना राजकीय पक्षांनी देखील सोडून द्यायला हवी. कारण देशाच्या शाश्वत विकासातच निवडणुकीच्या यशाचेही बीज दडले आहे हे गुजरातने दाखवून दिले आहे. शाश्वत विकास जो करतो त्याच्या पाठीशी जनता भरभक्कमपणे उभी राहते हे गुजरातने दाखवून दिल्याचे पंतप्रधान म्हणाले.

    त्याच वेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या डबल इंजिन सरकारची स्तुती केली. डबल इंजिन सरकार आल्यामुळे विकास प्रकल्पांमधले अडथळे दूर झाले आणि काम वेगात सुरू झाले याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेच, पण त्या पलिकडे जाऊन पंतप्रधानांनी गोसीखुर्द प्रकल्पाचे उदाहरण दिले. गोसी खुर्द प्रकल्पाला 30 – 35 वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्यावेळी त्या प्रकल्पाचा नियोजित खर्च फक्त 400 कोटी रुपये होता. परंतु नंतरच्या काळातल्या सरकारांनी त्या प्रकल्पाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि तो खर्च तब्बल 18 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आणि काहीच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या काळात त्याच्या कामाला वेग येऊन गोसीखुर्द प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. यंदाच्याच पावसात गोसीखुर्द धरण पूर्ण भरण्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

    नागपूरच्या 11 विकास नक्षत्रांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी विकासाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचे महत्त्व विशद केले. आरोग्यापासून पायाभूत सुविधांपर्यंत सर्व सम्यक विकास हा वेगाने आणि स्थैर्याने केला पाहिजे, याचा आग्रह पंतप्रधानांनी धरला. त्याच वेळी देशात शॉर्टकट राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. आमदानी अठन्नी आणि खर्चा रुपया हे राजकारण देशाला परवडणारे नाही. सवलतींचा भरमसाठ मारा केल्याने जनता वश होत नाही. उलट जनतेला रोजगार आणि स्थायी विकास देणारे सरकार आवडते याकडे पंतप्रधानांनी आवर्जून लक्ष वेधले. विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्यांनी आणणाऱ्यांना जनतेने घरी बसवले परंतु केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र येऊन त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले पण डबल इंजिन सरकारने त्यांचे इरादेही उध्वस्त केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

    Prime Minister’s visit to 11 Vikas Nakshatras in Nagpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले