• Download App
    कृषिमंत्र्यांकडूनच पंतप्रधानांच्या माफीचा अपमान; कृषी कायदे परत आणण्याच्या कथित विधानावरून राहुल गांधींचे टीकास्त्र |Prime Minister's apology insulted by Agriculture Minister; Rahul Gandhi's Tikastra on the alleged statement of bringing back agricultural laws

    कृषिमंत्र्यांकडूनच पंतप्रधानांच्या माफीचा अपमान; कृषी कायदे परत आणण्याच्या कथित विधानावरून राहुल गांधींचे टीकास्त्र

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकार कृषी कायदे पुन्हा आणू शकते, असे विधान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे.Prime Minister’s apology insulted by Agriculture Minister; Rahul Gandhi’s Tikastra on the alleged statement of bringing back agricultural laws

    आपल्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांनी लिहिले आहे, की केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या माफीचा अपमान केला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कोणतीही पावले टाकली, तर त्याचा आम्ही निषेध करू. अन्नदाता पुन्हा सत्याग्रह करेल. आधी अन्नदात्याने अहंकाराला हरवले आहे. पुन्हा एकदा आम्ही एकजुटीने अहंकार पराभूत करून दाखवू, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.



    केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायद्यासंदर्भात ते परत आणण्याचे कथित स्वरूपातले विधान आहे. परंतु त्यांनी केंद्र सरकार कृषी कायदे परत आणू, अशा स्वरूपाचे विधान केलेले नाही. कृषी क्षेत्रामध्ये सुधारणांची गरज आहे. देशातल्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, अशा स्वरूपाची विधाने नरेंद्रसिंह तोमर यांनी केली आहेत.

    या विधानांचा विशिष्ट अर्थ काढत प्रसार माध्यमांनी केंद्र सरकार पुन्हा एकदा कृषी कायदे आणणार असल्याचे वक्तव्य कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या तोंडी घातली आहेत. आणि त्यावरूनच राहुल गांधी यांनी कृषिमंत्री पंतप्रधानांच्या माफीचा अपमान करत असल्याचा श्र्लेश काढला आहे. त्यावर आधारित त्यांनी ट्विट करून अन्नदाता पुन्हा सत्याग्रह करेल, असा इशारा दिला आहे.

    Prime Minister’s apology insulted by Agriculture Minister; Rahul Gandhi’s Tikastra on the alleged statement of bringing back agricultural laws

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार