विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : न्यूझीलंडचे पंतप्रधान अन् दिल्लीच्या रस्त्यावर क्रिकेटचे धमाल!! असे अनोखे दृश्य दिल्लीच्या रस्त्यावर दिसले.
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन रायसीना डायलॉगचे प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली दौऱ्यावर आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुरुमू वगैरे नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भारताबरोबर संरक्षण विषयक करार केला. त्याचबरोबर रायसीना डायलॉग मध्ये त्यांचे प्रमुख भाषण झाले. त्यांचा हा सगळा दौरा ऑफिशियल प्रोटोकॉल प्रमाणे झाला.
त्या पलीकडे जाऊन न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिल्लीच्या रस्त्यावर मुलांबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्या समावेत न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर रॉस टेलर देखील मुलांबरोबर खेळण्यात रंगला. विटांनी रचलेले स्टंप आणि टेनिसचा बॉल यांनी या क्रिकेटच्या खेळात रंगत आणली. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडियावर या सगळ्या खेळाचे फोटो शेअर केले. त्याला मिलियन व्ह्यूज मिळाले. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आनंद अनेक पटींनी वाढला.
Prime Minister of New Zealand Christopher Luxon
महत्वाच्या बातम्या