• Download App
    गणेश चतुर्थी निमित्त देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीतून शुभेच्छा Prime Minister Narendra Modi's best wishes in Marathi to the people of the country on the occasion of Ganesh Chaturthi

    गणेश चतुर्थी निमित्त देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीतून शुभेच्छा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : श्री गणेश चतुर्थी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, अशा शब्दात पंतप्रधान मोदी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. Prime Minister Narendra Modi’s best wishes in Marathi to the people of the country on the occasion of Ganesh Chaturthi

    देशभरात ज्या प्रांतांमध्ये जो विशिष्ट सण उत्साहाने साजरा केला जातो त्या प्रांताच्या भाषेत शुभेच्छा देण्याची पंतप्रधान मोदींची खासियत आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन मोदींनी देशवासीयांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

    केरळमधील औणम सणाच्या वेळी ते मल्याळम भाषेत शुभेच्छा देतात तसेच तेच ते अनेकदा विविध भाषांमध्ये विविध प्रांतांना त्यांच्या सण आणि विशिष्ट दिवसांच्या दिवशी ट्विटरवरून शुभेच्छा देत असतात त्यानुसार त्यांनी आज गणेश चतुर्थी निमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

    Prime Minister Narendra Modi’s best wishes in Marathi to the people of the country on the occasion of Ganesh Chaturthi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे