वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार ( ता. २५ ) दुपारी १ वाजता उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर, जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी केली जाणार आहे. Prime Minister Narendra Modi will lay the foundation stone of the Noida International Airport in Jewar, Uttar Pradesh on November 25 at 1 pm.
पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची माहिती दिली. या विमानतळामुळे उत्तर प्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले भारतातील एकमेव राज्य बनणार आहे. दिल्ली एनसीआरमध्ये असलेले हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, अलीगढ, आग्रा, फरिदाबाद आणि शेजारच्या शहरांतील लोकांना त्यामुळे विमानसेवा उपलब्ध होईल.
हे विमानतळ उत्तर भारताचे लॉजिस्टिक गेटवे असेल. शहरे हवाई वाहतुकीने जोडण्याचे कार्य आणि स्वप्न या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्या दिशेने केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. या पूर्वी कुशीनगर विमानतळ आणि अयोध्या येथे आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळांचा विकास केला जात आहे.
विमानतळ दृष्टिक्षेपात
- उत्तर प्रदेशासाठी गेमचेंजर ठरणार
- महत्वाची शहरे हवाई वाहतुकीने जोडली जाणार
- जागतिक लॉजिस्टिक नकाशावर उत्तर प्रदेश
- माल वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार
- कार्गो टर्मिनलची क्षमता २० लाख मेट्रिक टन
- ८० लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवली जाईल
- औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होईल
- रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील
- विमानतळ एक ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन सेंटर बनेल
- मल्टीमॉडल ट्रान्झिट हब, गृहनिर्माण मेट्रो आणि हाय-स्पीड रेल्वे स्टेशन, टॅक्सी, बस सेवा आणि खाजगी पार्किंग असेल
- नोएडा आणि दिल्ली मेट्रो सेवेद्वारे जोडले जातील
- दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, महामार्ग विमानतळाशी जोडले जातील.
- दिल्ली-वाराणसी हाय-स्पीड रेल्वेने जोडले जाईल
- दिल्ली आणि विमानतळ प्रवास केवळ २१ मिनिटांत
- विमानतळावर देखभाल, दुरुस्ती, ओव्हरहॉलिंग सेवा
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध
- एक हरित विमानतळ म्हणून उदयास येणार
Prime Minister Narendra Modi will lay the foundation stone of the Noida International Airport in Jewar, Uttar Pradesh on November 25 at 1 pm.
महत्त्वाच्या बातम्या
- शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार नाराज; साताऱ्यात जाऊन घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाडाझडती!!
- बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा, ममता बॅनर्जींच्या गळ्यात गळा, २२ वर्षांची सायोनी घोषने मुख्यमंत्र्यांच्या सभेत घातला गोंधळ
- कॉँग्रेसचा कचरा आम्हाला घ्यायचा नाही अन्यथा संध्याकाळपर्यंत २५ आमदार आपमध्ये येतील, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल