• Download App
    जन्मगाव परौख मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत!!Prime Minister Narendra Modi was welcomed by President Ramnath Kovind at his hometown Parokh

    इतिहास घडला : जन्मगाव परौख मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत!!

    प्रतिनिधी

    कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यात परौख गावामध्ये आज एक अनोखा इतिहास घडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या जन्मगावामध्ये स्वागत केले. इतकेच नाही तर आपले जन्मगाव स्वतः फिरून पंतप्रधानांना दाखविले. Prime Minister Narendra Modi was welcomed by President Ramnath Kovind at his hometown Parokh

    राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकत्रितरीत्या विद्यमान राष्ट्रपतींच्या जन्मगावाला भेट देण्याचा हा भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासातला हा पहिलाच प्रसंग घडला आहे. एवढेच नाही तर परौख सारख्या छोट्या गावात एकाच वेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची दुर्मिळ घटनाही आज घडली आहे. राष्ट्रपतींनी स्वतः परौख गावातील हेलिपॅडवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता गोविंद उपस्थित होत्या.

    कानपूर देहात जिल्ह्यात परौख हे छोटेसे गाव वसते. तेथेच रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. पाचवी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर रामनाथ कोविंद यांचे शिक्षणासाठी गावाबाहेरच्या पाच किलोमीटर अंतरावरील शाळेत नाव घातले. तेथे रामनाथ कोविंद अनवाणी पायाने पळत जात असत, अशी आठवण पंतप्रधानांनी नंतर जाहीर कार्यक्रमात सांगितली.

     वडिलार्जित घर मिलन केंद्र

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदावर असताना परौख गावाचा हा दुसरा दौरा झाला आहे. राष्ट्रपतींनी आपले वडिलोपार्जित घर समाज मिलन केंद्रामध्ये रूपांतरित केले आहे. तेथे अनेक महिला बचत गटांचे विविध उद्योग आणि उपक्रम चालतात. परौख गावामध्ये राष्ट्रपतींनी स्वतः लक्ष घालून विविध विकास प्रकल्प चालवले आहेत.

     राष्ट्रपतींची कुलदेवता पत्रीदेवीचे दर्शन

    राष्ट्रपतींची कुलदेवता पत्रीदेवीचे मंदिर देखील परौख गावात आहे. राष्ट्रपतींचे वडील या पत्रीदेवीची सेवा करत असत. हा सर्व भाग राष्ट्रपतींनी स्वतः फिरून पंतप्रधानांना दाखविला.

    राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री

    परौखच्या ग्रामस्थांनी या दोन्ही मान्यवरांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. परौख सारख्या छोट्या गावात एकाच वेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हजर राहिल्याने एक वेगळा इतिहास घडला आहे!!

     डॉ. राम मनोहर लोहिया यांची आठवण

    दस्तुरखुद्द राष्ट्रपतींनी आपल्या जाहीर भाषणांमध्ये एक वेगळी आठवणी सांगितली. राष्ट्रपतींच्या लहानपणी राष्ट्रीय पातळीवरचे एकच नेते परौख गावामध्ये येऊन गेले होते, त्यांचे नाव डॉ. राम मनोहर लोहिया!! त्यावेळी पहिल्यांदाच आपण जीप हे वाहन बघितले. कारण राम मनोहर लोहिया हे जीपमधून गावामध्ये आले होते, असे राष्ट्रपती म्हणाले.

     छोट्या गावातून येऊन मोठ्या पदांवर

    राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान स्मारकाला देश एकत्र भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, स्वतः आपण, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल – गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे छोट्या गावांमधून येऊन लोकशाहीतील वरिष्ठ पदांवर पोहोचल्याचा आवर्जून उल्लेख केला. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाही प्रक्रियेची ही खासियत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

     राष्ट्रपतीं समोर घराणेशाहीवर हल्लाबोल

    त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी देशातल्या लोकशाही प्रक्रियेवर घाला घालणाऱ्या घराणेशाही पक्षांवर देखील जोरदार प्रहार केले. ही देखील एक मोठी ऐतिहासिक घटना आज घडली. कारण राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य आत्तापर्यंत वर्जित मानले जात होते. परंतु, मोदींनी येथे देखील वेगळ्या पद्धतीने प्रोटोकॉल बाजूला ठेवत लोकशाही व्यवस्थेचे मूल्यमापन करताना घराणेशाहीशी संलग्न असलेल्या पक्षांवर प्रखर हल्ला चढविला. कानपूर देहात मधील परौख सारख्या छोट्या गावात हा इतिहास घडला, हे आजचे 3 जून 2022 चे वैशिष्ट्य ठरले आहे.

    Prime Minister Narendra Modi was welcomed by President Ramnath Kovind at his hometown Parokh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य