• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात विविध विषयांवर चर्चा; कोरोना वैश्विक शिखर संमेलनातही भाग घेणार। Prime Minister narendra Modi to visit US from today, discuss a number of issues with joe bidden

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात विविध विषयांवर चर्चा; कोरोना वैश्विक शिखर संमेलनातही भाग घेणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेचा दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची ते भेट घेणार असून विविध मुद्यावर ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. Prime Minister narendra Modi to visit US from today, discuss a number of issues with joe bidden

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा गेल्या दोन वर्षातील पहिलाच परदेश दौरा आहे. जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. दोन्ही नेत्यांनी तीन वेळा ऑनलाइन चर्चा केली आहे. मात्र, पहिल्यांदाच त्यांची सामोरा समोर भेट होत आहे. या भेटीत अफगाणिस्तान व तालिबान या विषयावर प्रामुख्याने चर्चा होईल.



    अमेरिकेत गेल्यानंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कला भेटी देणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितलं की, मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील. मोदी आणि बायडन यांच्यात २४ रोजी द्विपक्षीय बैठक होईल. यात पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहनावर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला आहेत.

    Prime Minister narendra Modi to visit US from today, discuss a number of issues with joe bidden

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती