वृत्तसंस्था
न्युयोर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनामध्ये संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे त्यांच्या हॉटेलबाहेर अनेक भारतीयांनी काल जल्लोषात स्वागत केले होते. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ ह्या घोषणा दिल्या होत्या.
Prime Minister Narendra Modi said India is heavily involved in vaccine development and manufacturing
पंतप्रधान मोदींनी लस उत्पादक कंपन्यांना भारतात उत्पादन सुरु करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतिय लस वितरण प्लॅटफॉर्म ‘COWIN’ एका दिवसात कोट्यावधी डोस प्रशासित करण्यासाठी डिजिटल सहाय्य देत आहे. भारताने लस विकास आणि निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवनूक केली आहे. भारताने आधीच डीएनए लस विकसित केली आहे. जी 12 वर्ष आणि वरील लोकांना दिली जाऊ शकते. तर आम्ही MRNA लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही एक नाकाद्वारे दिली जाणारी लसही विकसित केली आहे. आम्ही जगभरातील लाखो लोकांना लस देत आहोत. मी सर्व लसी उत्पादकांना भारतात लसी बनवण्यासाठी आमंत्रित करतो. कारण आमची तंत्रज्ञानावर आधारित लोकशाही आहे. ”
Prime Minister Narendra Modi said India is heavily involved in vaccine development and manufacturing
महत्त्वाच्या बातम्या
- पुन्हा ईडीचे समन्स, पुन्हा चौकशी! परिवहनमंत्री अनिल परब यांनी चौकशीसाठी हजर राहावे, सोमय्यांनी केले ट्विट
- 76th UNGA: थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचे संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधन, दहशतवादासह या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याची शक्यत
- PPF मध्ये फक्त १००० रुपये गुंतवून तुम्ही १२ लाखांपेक्षा जास्त कमावू शकता, पैसे गमावण्याचा नाही धोका
- बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता ; पडळकरांची ठाकरे – पवार सरकारवर टीका