• Download App
    पीएम मोदींनी घेतली भारतीय पॅरा अॅथलीट्सची भेट, खेळाडूंनी सांगितले त्यांचे पॅरालिम्पिकचे अनुभव । Prime Minister Narendra Modi Met The Indian Contingent Who Participated In The Tokyo Paralympics 2021

    पीएम मोदींनी घेतली भारतीय पॅरालिम्पिक वीरांची भेट, खेळाडूंनी सांगितले त्यांचे पॅरालिम्पिकचे अनुभव

    Tokyo Paralympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान खेळाडूंनी पॅरालिम्पिकचे अनुभव पीएम मोदींसोबत शेअर केले. नुकत्याच संपलेल्या या खेळांमध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांसह 19 पदके जिंकली आहेत. Prime Minister Narendra Modi Met The Indian Contingent Who Participated In The Tokyo Paralympics 2021


     

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान खेळाडूंनी पॅरालिम्पिकचे अनुभव पीएम मोदींसोबत शेअर केले. नुकत्याच संपलेल्या या खेळांमध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांसह 19 पदके जिंकली आहेत.

    पॅरालिम्पिक गेम्समधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

    अवनी लेखरा, सिंहराज अदाना, सुमीत अंतिल, मनीष नरवाल, प्रमोद भगत, कृष्णा नगर, भाविना पटेल, निषाद कुमार, देवेंद्र झाझरिया, योगेश कठुनिया, मरिअप्पन थंगावेलू, प्रवीण कुमार, सुहास यथिराज, सुंदर सिंह गुर्जर, शरद कुमार, हरविंदर सिंग आणि मनोज सरकार यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदके जिंकली आहेत. भारताच्या बाजूने 54 सदस्यीय संघाने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला, यात 9 स्पर्धांमध्ये आपले त्यांनी आव्हान सादर केले.

    Prime Minister Narendra Modi Met The Indian Contingent Who Participated In The Tokyo Paralympics 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- ते हिंसा पसरवत नव्हते; सर्वोच्च न्यायालयात सांगितले- वस्तुस्थिती तोडूनमोडून गुन्हेगार ठरवले

    Atishi’s : आतिशी यांच्या व्हिडिओवर पंजाबमध्ये गदारोळ; विरोधक म्हणाले- शीख गुरुंचा अपमान केला; म्हणाल्या- ‘कुत्र्यांचा आदर करा’ असे म्हटले होते

    बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही, मग घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या व्यथा समजतील का??