• Download App
    स्वत:ची "शांतिदूत" प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी गोव्याला पारतंत्र्यात ठेवले!!; मोदींचा घणाघातPrime Minister Narendra Modi launched a scathing attack on the people of Goa.

    स्वत:ची “शांतिदूत” प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी गोव्याला पारतंत्र्यात ठेवले!!; मोदींचा घणाघात

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गोवा मुक्तीसाठी तेव्हा जर सरदार वल्लभभाई पटेल यांची रणनीती स्वीकारली असती, तर गोवा मुक्त होण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांची प्रतिक्षा करावी लागली नसती, पण पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील “शांतिदूत” प्रतिमा जपायची होती म्हणून त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामातील क्रांतीकारकांवर परकीयांकडून अत्याचार होऊ दिले, गोव्यातील जनतेला त्यांनी पारतंत्र्यात ठेवले, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.Prime Minister Narendra Modi launched a scathing attack on the people of Goa.

    राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी बोलत होते. गोवा मुक्तीसाठी अनेक सेनानी गोव्यात झगडत होते, त्यांच्यावर परकीय आक्रमणकर्ते गोळ्या झाडत होते. मात्र केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी ‘मी गोव्यात सैन्य पाठवणार नाही’, अशी भूमिका घेतली. ज्यामुळे आपल्याच स्वतंत्र भारतात गोव्यातील जनतेला १५ वर्षे गुलामगिरीत रहावे लागले, अत्याचार सहन करावे लागले होते, हे गोव्याची जनता कधीही विसरणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

     

    यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळीचे तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला. त्यावेळी नेहरू म्हणाले होते की, जे लोक क्रांतीकारक म्हणून गोव्यात जात आहेत, त्यांनी क्रांतीकरक होण्याचे परिणाम समजून घ्यावेत, क्रांतीकारकांच्या पाठिशी सैन्य नसते. मी कदापी सैन्य पाठवणार नाही, असे म्हणत नेहरूंनी स्वतंत्र भारतात गोव्यातील जनतेला वा-यावर सोडले होते, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले.

    सावरकरांची कविता म्हटली म्हणून ह्रदयनाथ मंगेशकरांची गच्छंती!!

    काँग्रेसने गोव्यातील सुपुत्रावरही अन्याय केला आहे, असे सांगत मोदींनी पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचा अनुभव कथित केला. भारतरत्न स्व. लता दीदी त्यांच्या कुटुंबासोबत गोव्यात राहत होते. त्यावेळी त्यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर हे आाकशवाणीत होते. त्यावेळी त्यांनी वीर सावरकर यांची कविता रेडिओवरून म्हटली, ज्यामुळे त्यांची ऑल इंडिया रेडिओतून हकालपट्टी केली होती, अशीही आठवण मोदींनी करवून दिली. काँग्रेसने विचार स्वातंत्र्याला पायदळी तुडवले आहे. नेहरूंवर टीका केली म्हणून वर्षभर मजरूह सुलतानपुरी यांना जेलमध्ये टाकले. सीताराम केसरी यांचे काय झाले, हे सगळ्यांना ठाऊक आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

    Prime Minister Narendra Modi launched a scathing attack on the people of Goa.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही