• Download App
    सैनिकी शाळेत मुलींना देखील मिळणार प्रवेश : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे .... Prime Minister Narendra Modi held a flag hoisting ceremony at the Red Fort on the occasion of India's 75th Independence Day.

    INDIPENDANCE @75 : सैनिकी शाळेत मुलींना देखील मिळणार प्रवेश : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे ….

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळा पार पडला.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्त (75th Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी अत्यंत जल्लोषात हा सोहळा पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण घोषणा केली .सैनिकी शाळेत मुलींना देखील प्रवेश घेता येणार असल्याचे त्यांनी घोषीत केले . Prime Minister Narendra Modi held a flag hoisting ceremony at the Red Fort on the occasion of India’s 75th Independence Day.

    महत्त्वाचे मुद्दे –

    • सैनिकी शाळेत मुलींना देखील मिळणार प्रवेश, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
    • आता सरकारने ठरवलं आहे की, देशातील सर्व सैनिकी शाळेत मुलींना देखील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल.
    • कालबाह्य कायद्याच्या कचाट्यातून देशाची सुटका करण्याची वेळा आली आहे.
    • कालबाह्य झालेले नियम, प्रक्रिया रद्द करण्याचं केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन
    • भारत येत्या काही दिवसातच प्रधानमंत्री गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन सुरू करणाार आहे.
    • केंद्र सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करणार, पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
    • या उत्पादनांना देशात आणि परदेशात मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी आता सरकार ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल.
    • देशातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीमध्ये आणखी वाढ केली पाहिजे. त्यांना नव्या सुविधा दिल्या पाहिजेत
    • गावात आपल्या बचतगटांशी संबंधित 8 कोटीपेक्षा जास्त महिला भगिनी आहेत, त्या एकापेक्षा एक उत्तम उत्पादने तयार करतात.
    • आता गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क, डेटा यांचे बळ पोहोचू लागले आहे, गावात देखील डिजिटल उद्योजक तयार होत आहेत
    • आज आपण गावांमध्ये झपाट्याने परिवर्तन होत असताना पाहात आहोत.
    • देशात 110 हून जास्त आकांक्षी जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पोषण, रस्ते, रोजगार यांच्याशी संबंधित योजनांना प्राधान्य दिले जात आहे. यापैकी अनेक जिल्हे आदिवासी क्षेत्रात आहेत
    • देशातील जे जिल्हे मागास असल्याचे मानण्यात आले होते त्यांच्या आकांक्षा आम्ही जागृत केल्या आहेत.
    • 21 व्या शतकात भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे यासाठी जे वर्ग मागे आहेत त्यांना आपल्याला मदतीचा हात दिलाच पाहिजे
    • आपला पूर्व भारत, ईशान्य भाग, जम्मू काश्मीर, लडाखसह संपूर्ण हिमालय क्षेत्र असो, आपला किनारपट्टीचा भाग किंवा आदिवासी क्षेत्र असो, हे भाग भविष्यात भारताच्या विकासाचा मोठा आधार बनतील
    • जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. लवकरच इथे निवडणुका होणार
    • कुपोषणमुक्त केंद्र सरकारचा निर्धार आहे.
    • गरीबांना पोषणयुक्त तांदळाचं वाटप करणार
    • देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत सोयी सुविधा पोहचल्या पाहिजेत.
    • कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहता कामा नये असा संकल्प करुयात
    • सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे लक्ष्य प्राप्तीसाठी खूप गरज आहे.
    • 100 व्या स्वातंत्र्य दिनाला अद्याप 25 वर्ष आहेत. पण आपल्याला तेवढा वेळ पाहून चालणार नाही. हीच योग्य वेळ आहे. आपल्याला सर्वांना बदलावं लागणार आहे.
    • विचार करा आपल्याकडे जर स्वत:ची लस नसती तर? भारतात स्वत:ची पोलिओ लस मिळण्यासाठी किती वेळ गेला. पण आज आपण गर्वाने सांगू शकतो की, जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु आहे.

    Prime Minister Narendra Modi held a flag hoisting ceremony at the Red Fort on the occasion of India’s 75th Independence Day.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य