• Download App
    पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वासPrime Minister Narendra Modi has promised to supply five billion corona vaccines to the entire world by next year

    पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास

    कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताचे योगदान सांगताना पुढील वर्षीपर्यंत देशात पाच अब्ज कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन सुरू होईल. केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी या लसी उपलब्ध असतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोम येथे जी-२० परिषदेत दिला. Prime Minister Narendra Modi has promised to supply five billion corona vaccines to the entire world by next year


    विशेष प्रतिनिधी

    रोम : कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताचे योगदान सांगताना पुढील वर्षीपर्यंत देशात पाच अब्ज कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन सुरू होईल. केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी या लसी उपलब्ध असतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोम येथे जी-२० परिषदेत दिला.

    रोम येथे जी-२० देशांची परिषद सुरू आहे. या परिषदेत नरेंद्र मोदी यांनी एक पृथ्वी, एक आरोग्य दृष्टिकोनाची संकल्पना जगासमोर मांडली. कोरोना महामारीविरोधात सुरू असलेल्या युद्धात भारताने मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.

    पंतप्रधान मोदी यांनी कोरोना महामारीमुळे आलेल्या संकटावर भाष्य करतानाच अर्थव्यवस्था तसेच लसीकरणाबाबतही भारताची भूमिका मांडली. यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी लवचिक जागतिक पुरवठा साखळीच्या आवश्यकतेवर भर दिला. तसेच भारताने अवलंबिलेल्या कठोर आर्थिक सुधारणांवरही पंतप्रधानांनी चर्चा केली. याशिवाय जी२० देशांनी आर्थिक सुधारणा, पुरवठा साखळीतील वैविध्यात भारताला भागीदार बनविण्याचे आवाहनही केले.

    जागतिक आरोग्य संघटनेने भारताने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीला मंजुरी दिल्यास इतर देशांना मदत करण्याची प्रक्रिया सुलभ होईल, असे सांगून मोदी म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पाच अब्जहून अधिक डोसचे उत्पादन करण्यासाठी भारत सज्ज असून, केवळ आम्हीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ते उपलब्ध राहतील

    Prime Minister Narendra Modi has promised to supply five billion corona vaccines to the entire world by next year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही