• Download App
    Karnataka Election : ‘’आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता…’’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा! Prime Minister Narendra Modi criticized the Congress manifesto for the Karnataka elections

    Karnataka Election : ‘’आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता…’’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा!

    काँग्रेसने आज  कर्नाटक निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    होसपेट : कर्नाटकातील होसपेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (2 मे) जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांचा द्वेष आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल, पीएफआय या संघटना बंद करण्याची घोषणा केली आहे. Prime Minister Narendra Modi criticized the Congress manifesto for the Karnataka elections

    पंतप्रधान म्हणाले की आज हनुमानजींच्या या पवित्र भूमीला नतमस्तक होणे हे माझे मोठे भाग्य आहे, आज जेव्हा मी हनुमानजींना नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहे, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगबलीला कुलूपबंद करण्याचा निर्णय घेतला.. आधी श्रीरामाला कुलूप ठोकले होते आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना बंद करण्याची शपथ घेतली आहे. हे देशाचे दुर्दैव आहे की, काँग्रेस पक्षाला प्रभू श्री राम असतानाही अडचणी येत होत्या आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांच्याही अडचणी येत आहे.

    जाहीरनाम्यानुसार, काँग्रेसने म्हटले आहे की, ‘’जर त्यांना सत्ता काबीज करण्याची संधी मिळाली तर ते बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालतील. जात किंवा धर्माच्या आधारावर समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे.‘’

    याचबरोबर ‘’कायदा आणि राज्यघटना पवित्र आहेत, असे आमचे मत आहे. बजरंग दल आणि पीएफआय सारख्या व्यक्ती आणि संघटनांद्वारे बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक समुदायांमध्ये शत्रुत्व किंवा द्वेष वाढवणाऱ्या इतरांकडून त्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. अशा कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यासह आम्ही कायद्यानुसार निर्णायक कारवाई करू.’’ असंह काँग्रेसने म्हटलं आहे.

    Prime Minister Narendra Modi criticized the Congress manifesto for the Karnataka elections

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स