दोन्ही देशांमधील ही पहिली क्रॉस-बॉर्डर ऊर्जा पाइपलाइन आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (१८ मार्च) डिझेल पुरवठ्यासाठी भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाइपलाइनचे उद्घाटन करण्यात आले. ही पहिली क्रॉस बॉर्डर पाइपलाइन आहे, जी ३७७ कोटी रुपये खर्चून बांधली गेली आहे, त्यापैकी २८५ कोटी रुपये बांगलादेशमध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. भारताने ही रक्कम अनुदान सहाय्याअंतर्गत खर्च केली आहे. याद्वारे सुरुवातीला हाय-स्पीड डिझेल उत्तर बांगलादेशातील सात जिल्ह्यांमध्ये पाठवले जाईल. Prime Minister Narendra Modi and Sheikh Hasina inaugurated India Bangladesh Friendship Pipeline
२०१८मध्ये झाली बांधकामाला सुरुवात –
या प्रकल्पामुळे खर्च कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, या पाइपलाइनमुळे भारत-बांगलादेश संबंधांचा नवा अध्याय सुरू होईल. याशिवाय, सध्या भारतातून बांगलादेशला ५१२ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाने डिझेलचा पुरवठा केला जातो. १३१.५ किमी लांबीची पाइपलाइन आसाममधील नुमालीगढ येथून बांगलादेशला दरवर्षी १० लाख टन डिझेल पुरवेल. यामुळे केवळ वाहतूक खर्चच कमी होणार नाही, तर कार्बन उत्सर्जनही कमी होईल, असेही यावेळी मोदी म्हणाले. पाइपलाइन प्रकल्पाचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले होते. दोन्ही देशांमधील ही पहिली क्रॉस-बॉर्डर ऊर्जा पाइपलाइन आहे.
पाइपलाइनने भारत-बांग्लादेश संबंधांमध्ये नवा अध्याय –
उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, मैत्री पाइपलाइनने भारत-बांगलादेश संबंधात एक नवीन अध्याय जोडला आहे. “पीएम शेख हसीना यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बांगलादेशने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे आणि बांगलादेशच्या विकासाच्या या प्रवासात आम्ही योगदान देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.” असंही मोदींनी सांगितलं.
बांगलादेशचे संस्थापक नेते आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या जयंतीनंतर एका दिवसानंतर या पाइपलाइनचे उद्घाटन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संयुक्त प्रकल्प हा त्यांच्या ‘सोनार बांगला’ व्हिजनचे उत्तम उदाहरण आहे. हाय-स्पीड डिझेलची वार्षिक दहा लाख मेट्रिक टन (MMTPA) वाहतूक करण्याची क्षमता असलेली, पाइपलाइन सुरुवातीला उत्तर बांगलादेशातील सात जिल्ह्यांना हाय-स्पीड डिझेल पुरवेल.
“भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइन कार्यान्वित झाल्यामुळे भारतातून बांग्लादेशात एचएसडीची वाहतूक करण्यासाठी एक शाश्वत, विश्वासार्ह, किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल माध्यम स्थापित होईल आणि दोन्ही देशांमधील ऊर्जा सुरक्षेत सहकार्य आणखी वाढेल,” अरसे MEA ने म्हटले आहे.
Prime Minister Narendra Modi and Sheikh Hasina inaugurated India Bangladesh Friendship Pipeline
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादच्या नामांतराला विरोध; खासदार इम्तियाज जलील यांची उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा!!
- मेरा देश बदल रहा है….! जगातील सर्वात उंच पुतळा, पूल, सर्वात लांब बोगदा, प्लॅटफॉर्म अन् भव्य स्टेडियम बनवून भारताने केला विक्रम
- बार्शीतील ‘त्या’ घटनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधणाऱ्या संजय राऊतांना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…
- कशी होती मुंडे – गडकरी केमिस्ट्री??; गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरणात नितीन गडकरींनी सांगितले किस्से