• Download App
    देशात फक्त चार जाती; गरीब, युवा, महिला आणि शेतकरी!!; INDI आघाडीच्या जातीच्या राजकारणाला मोदींचा तडाखा!! Prime Minister Narendra Modi addresses Party Karyakartas from BJP Headquarter

    देशात फक्त चार जाती; गरीब, युवा, महिला आणि शेतकरी!!; INDI आघाडीच्या जातीच्या राजकारणाला मोदींचा तडाखा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  देशात फक्त चार जाती; गरीब, युवा, महिला आणि शेतकरी, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस प्रणित INDI आघाडीला जबरदस्त तडाखा हाणला.Prime Minister Narendra Modi addresses Party Karyakartas from BJP Headquarter

    देशात राहुल गांधी आणि INDI आघाडीच्या नेत्यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरून चार राज्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावला होता. मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला शह देण्यासाठी जाती जातींमध्ये भेद करण्याचा हा डाव होता. पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला शह देण्याचा काँग्रेसचा डाव पुरता उधळला गेला.

    या पार्श्वभूमीवर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांच्या अभिनंदन सोहळ्यात काँग्रेसला जातीच्या राजकारणावरून जबरदस्त तडाखे दिले

    पंतप्रधान मोदी म्हणाले :

    मी वारंवार सांगतोय, माझ्यासाठी देशात चार जातीच सर्वांत मोठ्या जाती आहेत. देशात नारीशक्ती, युवा शक्ती , शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चारच जाती आहेत. आपले ओबीसी साथीदार याच वर्गातून येतात. मोठ्या संख्येने आदिवासी लोक याच वर्गातून येतात. या निवडणुकीत चारही जातींनी भाजपच्या योजना आणि रोडमॅपवर उत्साह दाखवला आहे.

    आज प्रत्येक गरीब म्हणतोय, तो स्वत: जिंकलाय, प्रत्येक वंचितला, शेतकऱ्याला वाटतं ही निवडणूक आपण जिंकलोय. आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतं. प्रत्येक नागरिक हे आपलं यश मानतो.

    मी देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो. रॅलीत मी सातत्याने सांगायचो. या निवडणुकीत महिला शक्ती भाजपला विजयी करणार असल्याचा निश्चय केल्याचं सांगायचो. देशातील नारी शक्ती जेव्हा ज्याचं सुरक्षा कवच बनते, तेव्हा कोणतीही ताकद त्यांना रोखू शकत नाही. नारीशक्ती वंदन अधिनियमाने महिलांच्या मनात नवा विश्वास जागवला आहे. देशातील प्रत्येक महिलेच्या मनात भरवसा निर्माण झाला आहे. भाजप सरकारमध्ये त्याची भागिदारी उंचवणार आहे, असं या महिलांना वाटतं. भाजपच महिलांचा सन्मान करू शकते असं प्रत्येक कन्येला वाटतं.

    गेल्या 10 वर्षात भाजपने त्यांच्यापर्यंत टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बँकेत खाती अशा सुविधा दिल्या. भाजप कुटुंब, समाजात त्यांची आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी वाडवण्यासाठी निरंतर काम करत आहे, हे महिला पाहत आहेत. नारी शक्तीचा विकास हा भाजपच्या विकास मॉडेलचा स्तंभ आहे.

    चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये म्हणूनच महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. मी नम्रपणे देशातील महिलांना हेच सांगेन की तुम्हाला जी आश्वासनं दिली ती शत प्रतिशत पूर्ण करू. ही मोदींची गॅरंटी आहे. आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी!!

    Prime Minister Narendra Modi addresses Party Karyakartas from BJP Headquarter

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Terrorist Tahawwur Rana : दहशतवादी तहव्वुर राणा 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत; सुरक्षेच्या कारणास्तव एक दिवस आधी हजेरी

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण