• Download App
    युरोपात पंतप्रधान मोदींच्या मराठमोळ्या स्वागताचा बोलबाला!!; डेन्मार्कमध्ये विमानतळावर ढोल-ताशाचा गजर!!Prime Minister Modi's warm welcome in Europe

    Modi in Europe : युरोपात पंतप्रधान मोदींच्या मराठमोळ्या स्वागताचा बोलबाला!!; डेन्मार्कमध्ये विमानतळावर ढोल-ताशाचा गजर!!

    वृत्तसंस्था

    कोपनहेगन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या भरगच्च कार्यक्रमातून ते युरोपमधल्या भारतीयांना आवर्जून भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत, पण यामध्ये सर्वाधिक बोलबाला होतो आहे तो मराठी मंडळींनी मोदींच्या केलेल्या स्वागताचा…!!

    युरोपमध्ये जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये मराठी मंडळींनी आपल्या मराठमोळ्या पोशाखात आणि ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आहे आणि हे स्वागत सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. जर्मनीत प्रत्यक्ष चान्सलरी समोर म्हणजे जर्मनीच्या पंतप्रधान कार्यालयासमोर मराठी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आणि ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.

    जर्मनीचा दौरा आटोपून मोदी डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन मध्ये पोहोचले. तेथे विमानतळावर त्यांचे सरकारी स्वागत झालेच, पण त्याचबरोबर डेन्मार्कमधील मराठी युवकांनी मराठमोळ्या वेशात आणि ढोल-ताशांच्या गजरात भगवा ध्वज नाचवत मोदींचे स्वागत केले. मोदींनी देखील त्यांना अभिवादन करीत ते स्वागत स्वीकारले. मोदी सध्या डेन्मार्कमध्ये असून ते द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील पण या दौऱ्यात मराठी मंडळींकडून मोदींचे भरघोस स्वागत होत आहे, या विषयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

    Prime Minister Modi’s warm welcome in Europe

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट