उमेदवारी दाखल करण्यापूर्वी काशीमध्ये रोड शो करणार
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधी 13 मे रोजी वाराणसीमध्ये रोड शोही होणार आहे. वाराणसी लोकसभा जागेवर 1 जून रोजी मतदान होणार आहे.Prime Minister Modi’s nomination filing date has been fixed
पंतप्रधान मोदींचा विजय ऐतिहासिक करण्यासाठी पक्ष कोणतीही कसर सोडणार नाही. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भाजपचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते वाराणसीला पोहोचणार आहेत. येथे छोट्या सार्वजनिक सभा घेणार आहेत, पन्ना प्रमुखांच्या बैठका घेणार आणि मतदारांशीही संपर्क साधणार आहेत. याशिवाय समाजातील विविध लोकांच्या भेटीगाठी घेण्यात येणार आहेत.
वारणसीला पोहोचणाऱ्या नेत्यांची यादीही तयार केली जात असून कार्यकर्त्यांकडूनही यादी मागवली जात आहे. पंतप्रधानांचा रोड शो भव्यदिव्य करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल आणि गुजरातहून आलेले जगदीश पटेल यांनी बैठका सुरू केल्या आहेत. यामध्ये महिला मोर्चाचीही प्रमुख भूमिका असणार आहे.