अर्थसंकल्पाचे वर्णन देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प असे केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी 2024 सालचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी सरकारच्या यशाची माहिती दिली. अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले.Prime Minister Modis first reaction to the Interim Budget
मोदी म्हणाले आजचा अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या चार स्तंभांना सक्षम करेल – तरुण, गरीब, महिला, शेतकरी. तसेच पंतप्रधान मोदींनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे, असे केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अर्थसंकल्प तरुण भारताच्या युवा आकांक्षा प्रतिबिंबित करतो. अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते म्हणाले की, संशोधन आणि नवोपक्रमासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय मोदी म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. NANO DAP चा वापर, जनावरांसाठी नवीन योजना, PM मत्स्य संपदा योजनेचा विस्तार आणि स्वावलंबी तेलबीज अभियान यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल.
पंतप्रधान म्हणाले की, हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गाच्या सक्षमीकरणावर आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर देतो. गरिबांसाठी आणखी 2 कोटी घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली असून 3 कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. आता आशा आणि अंगणवाडी सेविकांनाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.
Prime Minister Modis first reaction to the Interim Budget
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्प 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार!
- सीतारामन यांच्या बडतर्फीची मागणी पडली महागात, आयआरएस अधिकारी निलंबित
- ED च्या धसक्याने झारखंडमध्ये उलटफेर; कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करायचा निर्णय बारगळला; चंपई सोरेन यांची करावी लागली निवड!!
- राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याएवढाच ज्ञानवापीचा निर्णय महत्त्वाचा; व्यास तळघरात पूजेचा अधिकार; हे व्यास तळघर आहे तरी काय??