विशेष प्रतिनिधी
बडवानी : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकांमध्ये बटाट्यापासून सोने बनवण्याची बात मारली होती. त्यावेळी मीडियावर त्यांची भरपूर खिल्ली उडवली गेली होती. आज त्याचीच आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यप्रदेशातील बडवानीतल्या प्रचार सभेत काढली. Prime Minister Modi’s attack on Congress
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खोचक टिपणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेस आता मध्य प्रदेशात सोन्याचे महाल बनवण्याचे आश्वासन देईल. पण ते सोने काँग्रेसचे नेते बटाट्यातून काढणार आहेत का??, असा खोचक सवाल मोदींनी करून काँग्रेस आणि राहुल गांधींची पुन्हा एकदा खिल्ली उडवली.
काँग्रेसने मध्य प्रदेशात 500 रुपयांत गॅसपासून प्रत्येक बेरोजगाराला 2500 रुपयांचे आश्वासन दिले आहे. आश्वासनांची मोठी जंत्रीच त्यांनी जाहीरनाम्यात प्रसिद्ध केली आहे. या “मोफत” स्कीमवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केला आणि सोन्याच्या महालाचा खोचक उल्लेख केला. काँग्रेसच्या या कुठल्याच आश्वासनाकडे लक्ष देऊ नका. कारण आश्वासन पूर्तीसाठी काँग्रेस प्रसिद्धच नाही, काँग्रेस विश्वासघातासाठी कुप्रसिद्ध आहे, असा टोला पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला हाणला.