‘’कदाचित कोलकाताहून फोन आला असेल…’’ असं म्हणत काँग्रेसवर साधला निशाणा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१० ऑगस्ट) विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर जोरदार प्रहार केला. मोदी म्हणाले, “विरोधकांच्या सर्वात मोठ्या नेत्याला वक्त्यांच्या यादीत स्थान देण्यात आले नाही. हे अमित शाहांचे औदार्य आहे की त्यांनी अधीर रंजन चौधरी यांना वेळ देण्याचे आश्वासन दिले. अधीर रंजन चौधरी यांना का बाजूला केले जाते ते मला कळत नाही. काँग्रेसची काय मजबुरी होती, कदाचित कोलकाताहून फोन आला असेल.” Prime Minister Modis Andhir Ranjan Chaudharys comment
याशिवाय, ‘’पंतप्रधान मोदींनी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले, “अमित शाहांनी वेळ दिला पण ते (अधीर रंजन चौधरी) गुळाचे शेण बनवण्यात माहीर आहेत. यावेळी अधीर बाबूंची अवस्था अशी झाली आहे की, त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. अधीर बाबूंबद्दल संपूर्ण सहानुभूती आहे.”
याचबरोबर, “अशा काही गोष्टी या अविश्वास प्रस्तावातही पाहायला मिळाल्या, ज्या यापूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव वक्त्यांच्या यादीत नव्हते. 1999 मध्ये अविश्वास ठराव आला होता वाजपेयी सरकारच्या विरोधात प्रस्ताव आला. शरद पवारांनी त्याचे नेतृत्व केले होते. सोनिया गांधी यांनी 2003 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला होता, मल्लिकार्जुन खर्गे यांनी 2018 मध्ये विषय पुढे नेला. यावेळी अधीर रंजन चौधरांबाबतच असे काय झाले.”
अधीर रंजन चौधरी यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, “अविश्वास प्रस्तावाची ताकद आज पंतप्रधानांना संसदेत घेऊन आली आहे. आमच्यापैकी कोणीही या अविश्वास प्रस्तावाचा विचार करत नव्हते. आमची मागणी होती की, पंतप्रधान मोदींनी संसदेत येऊन मणिपूरच्या मुद्य्यावर चर्चा करावी. भाजपच्या कोणत्याही सदस्याने संसदेत यावे अशी आमची मागणी नव्हती, आम्ही फक्त पंतप्रधान यावेत अशी मागणी करत होतो.”
Prime Minister Modis Andhir Ranjan Chaudharys comment
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??