• Download App
    पंतप्रधान मोदी यंदाही जवानांसोबत साजरी करणार दिवाळी ; जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये जाणार! Prime Minister Modi will celebrate Diwali with the soldiers Will go to Akhnoor sector of Jammu

    पंतप्रधान मोदी यंदाही जवानांसोबत साजरी करणार दिवाळी ; जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये जाणार!

    मागील वर्षीही दिवाळीच्या मुहूर्तावर मोदी कारगिलला पोहोचले होते.

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. मोदी जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये जाऊन भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.Prime Minister Modi will celebrate Diwali with the soldiers Will go to Akhnoor sector of Jammu

    पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही दिवाळीच्या मुहूर्तावर ते कारगिलला पोहोचले होते, तिथे त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दीपोत्सव साजरा केला होता.

    ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना या दिवाळीत स्थानिक पातळीवर उत्पादित उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे आणि ‘नमो अॅप’वर त्या उत्पादनासह किंवा त्याच्या निर्मात्यांसोबत सेल्फी शेअर करा असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते, “या दिवाळीत आपण नमो अॅपवर #Vocal for Local सह भारताची उद्योजकता आणि सर्जनशीलता साजरी करूया.”

    मोदी म्हणाले होते, “स्थानिकरित्या बनवलेली उत्पादने खरेदी करा आणि नंतर नमो अॅपवर उत्पादन किंवा निर्मात्यासोबत सेल्फी शेअर करा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना या उपक्रमात सामील होण्यासाठी आणि सकारात्मकतेची भावना पसरवण्यासाठी आवाहन करा.” तसेच, “स्थानिक प्रतिभेला पाठिंबा देण्यासाठी, आपल्या सहकारी भारतीयांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या परंपरा समृद्ध ठेवण्यासाठी आपण डिजिटल मीडियाच्या सामर्थ्याचा वापर करूया.” असंही मोदी म्हणाले आहेत.

    Prime Minister Modi will celebrate Diwali with the soldiers Will go to Akhnoor sector of Jammu

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत