विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानीत दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने एका कॉलेजची स्थापना करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या कॉलेजचे भूमिपूजन होणार आहे.
दिल्ली विद्यापीठामध्ये उत्तर आणि दक्षिण हे दोन कॅम्पस असून दोन नव्या पूर्व आणि पश्चिम कॅम्पसची निर्मिती या निमित्ताने होत आहे. यापैकी एका कॅम्पस मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने नव्या कॉलेजची निर्मिती होत आहे. दुसऱ्या कॉलेजला माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव देण्यात येणार आहे.
Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!
सावरकर आणि सुषमा स्वराज यांच्या नावाने कॉलेज स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेटमध्ये केली होती. आता ती घोषणा प्रत्यक्षात येत आहे. उद्या पंतप्रधान मोदी दिल्ली विद्यापीठामध्ये सावरकरांच्या नावाच्या कॉलेजचे भूमिपूजन करणार आहेत. द्वारका आणि नजफगडमध्ये तीन कॉलेजची निर्मिती होत असून त्यामध्ये एक विधी महाविद्यालय आहे.
Prime Minister Modi to lay the foundation stone of Veer Savarkar College in Delhi tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!
- INDI alliance : नेतृत्व पदासाठी सर्कस सुरू; ममतांचे नाव पिछाडीवर, अखिलेश यादवांचे नाव आघाडीवर!!
- South Korea : दक्षिण कोरियात विमान अपघात, 179 जणांचा मृत्यू; लँडिंगदरम्यान चाके उघडली नाहीत, भिंतीला धडकताच मोठा स्फोट