जाणून घ्या, नेमकं असं काय घडलं आणि सिद्धरामय्यांची कशी होती प्रतिक्रिया?
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की मुख्यमंत्रीजी, असं होतच असतं. बोईंगच्या नवीन जागतिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी सिद्धरामय्यांच्या उपस्थितीतच पंतप्रधान मोदींनी हे भाष्य केले.
यावेळी पंतप्रधान मोदी कार्यक्रमाला संबोधित करत असताना अचानक उपस्थित लोकांनी ‘मोदी-मोदी’च्या जोरदार घोषणा दिल्या. याबाबत मोदींनी सिद्धरामय्या यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मुख्यमंत्रीजी, असं होतच असतं. तर मोदींचं हे म्हणणे ऐकून सिद्धरामय्या डोकं खाजवताना दिसले. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे.
मोदींनी बंगळुरूमध्ये बोईंगच्या नवीन ग्लोबल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी सेंटर कॅम्पसचे उद्घाटन केले. यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, अमेरिकेबाहेर विमान उत्पादक कंपनीची ही सर्वात मोठी सुविधा असेल. त्यामुळे ही सुविधा केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या विमान वाहतूक बाजारपेठेला नवे बळ देणार आहे.
Prime Minister Modi targeted Chief Minister Siddaramaiah in a public event
महत्वाच्या बातम्या
- दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!
- वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!
- अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!