वृत्तसंस्था
अबूधाबी : संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एका भव्य कार्यक्रमात पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले यावेळी अरबस्थानात राहणाऱ्या लाखो हिंदू भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. एका मुस्लिम राष्ट्रात उभे राहिलेले हे सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे. Prime Minister Modi inaugurated the first Hindu temple in a grand ceremony in Abu Dhabi!
उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी स्वामी महाराजांच्या समवेत मंदिरातील महाआरतीत सहभागी झाले. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबुधाबी मध्ये हिंदू मंदिर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्या इच्छेनुसार संयुक्त अरब अमिरातीच्या युवराज यांनी मोदींनी पसंत केलेली 30 एकर जागा मंदिरासाठी दान केली. त्यापैकी 27 एकर जागेवर हे मंदिर उभे राहिले आहे. राजस्थानातील बालुआ पत्थरातून बनलेले हे मंदिर अरबस्तानच्या भूमीतला एक वास्तुशिल्पाचा एक अद्भुत चमत्कार मानले जात आहे.
मंदिराच्या उद्घाटनापूर्वी भारतीय परंपरेनुसार पंतप्रधान मोदींनी गंगा आणि यमुनेच्या जलाचे पूजन केले. त्यानंतर त्यांनी मंदिरात श्री स्वामी महाराजांसमवेत प्रवेश करून महाआरती केली. हिंदू मंदिरातर्फे स्वामी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री नाहयान बिन मुबारक अल् नाहयान यांचा सत्कार केला. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील मैत्री सद्भावाचे हे मंदिर प्रतीक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
Prime Minister Modi inaugurated the first Hindu temple in a grand ceremony in Abu Dhabi!
महत्वाच्या बातम्या
- जयंत चौधरी यांच्या पक्षाची एनडीएला साथ, यूपीमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का
- तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप; राज्यपाल म्हणाले – हा भयंकर आणि धक्कादायक प्रकार
- पाकिस्तानच्या निवडणुका अवैध घोषित करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका; काळजीवाहू पंतप्रधानांनी दिले स्पष्टीकरण
- महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयांच्या कायाकल्पासाठी आशियायी बँकेचे 4000 कोटींचे कर्ज मंजूर; पहिल्या टप्प्यात 1200 कोटी मिळणार!!