• Download App
    व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही पंतप्रधान मोदींचा दबदबा, एका आठवड्यात सब्सक्राइबर संख्या ५० लाखांच्या पुढे Prime Minister Modi dominates the WhatsApp channel too the number of subscribers in a week exceeds 5 million

    व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही पंतप्रधान मोदींचा दबदबा, एका आठवड्यात सब्सक्राइबर संख्या ५० लाखांच्या पुढे

    मोदी हे सर्वाधिक फॉलो केलेल्या भारतीय राजकारण्यांपैकी एक आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता मोजणे कठीण आहे. एक्स (ट्विटर), फेसबुकनंतर आता व्हॉट्सअॅपवरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. त्यांची फॅनफॉलोइंग प्रचंड वाढली आहे. Prime Minister Modi dominates the WhatsApp channel too the number of subscribers in a week exceeds 5 million

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर नवीन फीचरमध्ये सामील झाल्यानंतर, अवघ्या एका आठवड्यात ५० लाखांहून अधिक सदस्य झाले आहेत. २० सप्टेंबर रोजी मोदींच्या व्हॉट्सअॅप चॅनेलने एक मैलाचा दगड गाठला. अवघ्या एका दिवसात १० लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.  मोदींच्या व्हॉट्सअॅप चॅनलवरील पहिल्या पोस्टवर काही मिनिटांतच शेकडो प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

    अलीकडेच व्हॉट्सअॅप चॅनलवर शेअर केलेल्या मेसेजमध्ये मोदी म्हणाले की, जसे की आपण ५० लाखांहून अधिक लोकांचा समुदाय झालो आहोत, माझ्या व्हॉट्सअॅप चॅनलद्वारे जोडले गेलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. तुमच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि जुडण्याबद्दल मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे आभार मानतो.

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोदींचे फॉलोअर्स आश्चर्यकारक आहेत. मोदी हे सर्वाधिक फॉलो केलेल्या भारतीय राजकारण्यांपैकी एक आहेत. तसेच मोदींचे फेसबुकवर ४८ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे ७८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर  ट्वीटरवर ९१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

    Prime Minister Modi dominates the WhatsApp channel too the number of subscribers in a week exceeds 5 million

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये