विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 परिषदेचे सर्वत्र कौतुक झाले. या परिषदेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्व कर्मचाऱ्यांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भारत मंडपममध्ये डिनर देणार आहेत. G20 परिषद यशस्वी करण्यासाठी 3000 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. त्या सर्वांची मोदी आज संध्याकाळी 6.00 वाजता भारत मंडपममध्ये भेट घेणार आहेत. Prime Minister Modi dines with 3000 G20 officials at the Bharat Mandapam
या 3000 लोकांमध्ये खासकरून अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांनी शिखर परिषद सुरळीत पार पाडण्यासाठी कष्टाचे काम केले. यामध्ये सफाई कामगार, चालक, वेटर आणि विविध मंत्रालयातील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी विविध खात्यांचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
राबणाऱ्या हातांचा पंतप्रधान मोदींना नेहमीच लगाव राहिला आहे काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर बांधणाऱ्या कर्मचाऱ्यांसमवेत्यांनी उद्घाटन कार्यक्रमानंतर भोजन घेतले होते. नव्या संसद भवनाचे काम सुरू असताना देखील त्यांनी अनेकदा तिथे भेट देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता G20 परिषद यशस्वी करण्यासाठी राबलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोदी सरकारी भोजन देणार आहेत.
नवी दिल्ली येथे भारताच्या अध्यक्षतेखाली 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे G 20 परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिखर परिषदेत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, सौदी अरेबिया, अर्जेंटिना यासह जगातील सर्व शक्तिशाली देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते.
सध्या G20 मध्ये भारताव्यतिरिक्त रशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, चीन, मेक्सिको, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, तुर्की, ब्रिटन आणि एक युरोपीय देशांचा समावेश आहे.
Prime Minister Modi dines with 3000 G20 officials at the Bharat Mandapam
महत्वाच्या बातम्या
- सोन पावलांनी महाराष्ट्राच्या घराघरात गौराईचं थाटात आगमन! कुठे महालक्ष्मी तर कुठे गौराई म्हणत झाल्या विराजमान!
- गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी राज ठाकरेच्या सभेचा देखावा! कल्याण मधील एका तरुणांना साकारला हा देखावा!
- नारीशक्ती विधेयक संसदेत मंजूर; पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनासाठी महिला खासदारांची एकजूट!!
- सोन पावलांनी महाराष्ट्राच्या घराघरात गौराईचं थाटात आगमन! कुठे महालक्ष्मी तर कुठे गौराई म्हणत झाल्या विराजमान!